कल्याण : (Kalyan Doctor Assault) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी शास्त्रीनगर रूग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. म्हात्रे यांच्या सहका-यांनीही डॉक्टरला मारहाण केली. नर्सला देखील अर्वाच्य भाषेत शिवीगाळी केली. याचा निषेधार्थ शास्त्रीनगरसह रूक्मिणीबाई रूग्णालयातील डॉक्टरांनी कामबंद आंदोलन छेडले होते.(Kalyan Doctor Assault)
पश्चिमेकडील ३३ वर्षीय गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रूग्णालयात आणले होते. परंतू सोनोग्राफीत तीच्या बाळाची नाळ गळयात अडकल्याचे दिसून आले. प्रसूतीनंतर बाळाला एनआयसीयूत उपचारांची आवश्यकता लागू शकते. इथे जागा नसल्याने सायन येथील रूग्णालयात नेण्यास सांगितले गेले आणि यावरून वाद झाला. याप्रकरणात मंगळवार संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यास सुरुवात झाली.(Kalyan Doctor Assault)