शस्त्रसंधीनंतरही इराण-अमेरिकेचे हल्ले सुरूच! मध्यरात्री होणार मोठा हल्ला, ८० ठिकाणे उध्वस्त करण्याची ट्रम्प यांची धमकी!

    08-Jul-2026

NATO
 
 
तेहरान : “आम्ही काल रात्री इराणवर जोरदार हल्ला केला. आमचे शत्रू असलेल्या क्रूर लोकांवर आम्ही हल्ला केला आहे. त्यांनी हल्ला केला तर आम्ही पुन्हा प्रतिहल्ला करू”, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भूमिकेने जगभरातील शेअर बाजारात पडझड झाल्याचे दिसून आले. अमेरिका आणि इराणमध्ये झालेली शस्त्रसंधी आता संपली आहे. बुधवार, दि. ८ जुलै रोजी झालेल्या नाटो समीटमध्ये अमेरिका पुन्हा एकदा इराणवर हल्ला करेल, असा इशारा दिला.
 
अमेरिकेने मंगळवारी रात्री उशीरा इराणच्या एकूण ८० ठिकाणी हवाई हल्ला केला. अमेरिकेची सेंट्रल कमांड यंत्रणा (सेंटकॉम) यांच्या मते, ही कारवाई इराणने जहाजांवर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर होती. अमेरिकेने इराणच्या शाहिक हक्काने पोर्टवर हवाई हल्ला केला. त्यानंतर धुराचे लोट हवेत पसरले होते. इराणने होमुर्झच्या सामुद्रधुनीत तीन टँकरवर निशाणा साधला. हा कतारचा टँकर असल्याचे स्पष्ट झाले. याच दरम्यान इराणचे माजी सुप्रीम लीडर आयातुल्लाह खामेनींवर अंत्यसंस्कार सुरू होते. होमुर्झमार्गे वाहतूक करू नका, असा इशारा इराणने यापूर्वी दिला होता, त्यानंतर हा हल्ला करण्यात आला होता.
 
 
कतारने या हल्ल्याच्या विरोधात कठोर शब्दात निंदा केली आहे. ईराण हा आंतरराष्ट्रीय वाहतूकीसाठी धोकादायक देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इराणने अमेरिकेवर निशाणा साधत पूर्वीच्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली आहे. धमक्यांच्या आड कुठल्याही प्रकारचा करार होणार नसल्याचे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले.
दरम्यान खामेनींच्या दफनविधीवेळी लाखोंचा समुदाय एकवटला होता. काहींनी त्यांच्या मृतदेहावर लाल रंगाचे कापड वाहिले आहे, याचा अर्थ आम्हाला बदला घ्यायचा आहे, अशी जनभावना तिथल्या नागरिकांमध्ये दिसून आली. खामेनींचे पार्थीव मंगळवारी रात्री नजफ येथे पोहोचले. गेले काही दिवस सुरू असलेल्या अंत्यदर्शन यात्रेनंतर त्यांचे पार्थीव विशेष विमानाने नजफ येथे आणण्यात आले.
नाटोच्या अध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थन करत हा हल्ला गरजेचाच असल्याचे म्हटले आहे. नाटोचे अध्यक्ष मार्क रूट म्हणाले की, “होमुर्झमार्गे जाणाऱ्या तीन मालवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर ही कारवाई गरजेचीच होती. इराण-अमेरिकेत झालेल्या १४ मुद्द्यांच्या आधारे शांतता करार प्रस्थापित करण्यात आला होता. मात्र, आता इराणने अमेरिकेला डिवचले आहे. जेव्हा संघर्ष विराम झालेला असेल तरीही इराण कुरघोड्या करत असेल तर अमेरिकेने उत्तर देणे गरजेचे आहे.”
 




संबंधित मजकूर