"सायबर फसवणूक टाळण्यासाठी सावध राहणे गरजेचे" - सुदेश आजगावकर

    08-Jul-2026
Cyber Fraud Awareness
 
कल्याण : (Cyber Fraud Awareness) सायबर गुन्हे आणि फसवणूक टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी नेहमीच सावध राहण्याची गरज आहे, असे मत सायबर पोलीस स्टेशन ठाणे, पोलीस निरीक्षक सुरेश वसंत आजगावकर यांनी व्यक्त केले.
 
दि कल्याण जनता सहकारी (मल्टीस्टेट शेड्युल्ड )बँकेच्या वतीने सहकार सप्ताहा निमित्त 'सायबर गुन्ह्यापासून संरक्षण' या जनजागृती पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सोमवार दिनांक ०६ जुलै २०२६ रोजी पंडित वाडी, ब्राह्मण सभा हॉल कल्याण येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.(Cyber Fraud Awareness)
 
सदर कार्यक्रमाला कल्याण येथील ज्येष्ठ नागरिक, आजी-माजी संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तरे झाली . कार्यक्रमाचे नियोजन डीजीएम सुनील भोईर व जीएम मिलिंद फाटक यांनी केले. बँकेच्या वतीने अध्यक्ष एड. संपदा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. आजगावकर यांनी त्यांना अनुभवास आलेली अनेक उदाहरणे देऊन ज्येष्ठ नागरिकांनी काय काय करायला हवे याबाबत मार्गदर्शन केले. सायबर सिक्युरिटी बाबत बँकेची भूमिका व तयारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या दरेकर यांनी केले. बँकेचे उपाध्यक्ष महेश देशपांडे यांनी आभार मानले.(Cyber Fraud Awareness)
 
 




संबंधित मजकूर