नवी दिल्ली: (Congress Media Cell) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यादरम्यानचे व्हिडिओ कथितपणे एडिट करून सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी काँग्रेसच्या मीडिया सेलवर भाजपने तीव्र टीका केली आहे. भाजपचा आरोप आहे की, संबंधित पोस्टमध्ये आक्षेपार्ह आणि महिलांविरोधी आशय वापरण्यात आला होता. या पोस्टवर सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर काँग्रेसने ती पोस्ट हटवल्याचे समोर आले आहे. मात्र आता माध्यमांवरून म्हटलं जात आहे कि, टीका झाल्यावर पोस्ट डिलीट करण्यापेक्षा देशाला लाज आणणारं कृत्य करायचंच कशाला. (Congress Media Cell)
भाजपच्या नेत्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, भारताचे पंतप्रधान आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करत असताना अशा प्रकारचे संपादित (एडिट) व्हिडिओ प्रसारित करणे हे देशाच्या प्रतिमेला धक्का देणारे असल्याचा आरोप केला. तसेच संबंधित पोस्टमधील आशय महिलांचा अवमान करणारा असल्याचाही दावा भाजपने केला. (Congress Media Cell)
संबंधित पोस्ट हटवण्यात आली असली तरी त्यामागील मानसिकता उघड झाली आहे. पक्षाच्या काही नेत्यांनी काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी सातत्याने आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोपही केला. दुसरीकडे, या प्रकरणावर काँग्रेसकडून अधिकृत भूमिका काय आहे किंवा पोस्ट का हटवण्यात आली याबाबत तत्काळ अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. (Congress Media Cell)