"त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली!" आरोपी मुलाचा मृतदेह स्वीकारण्यास आईचा नकार

    08-Jul-2026   

Bengal Rape Murder Accused
 
मुंबई (Bengal Rape Murder Accused) : पश्चिम बंगालमधील बरुईपूर येथे अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रभास मंडल पोलिसांच्या चकमकीत ठार झाल्यानंतर त्याच्या आईने मुलाचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. माझ्या मुलाने चांगले काहीच केले नाही. त्याने जे कृत्य केले, त्याची शिक्षा त्याला मिळाली. पोलिसांनी त्याच्या मृतदेहाबाबत जे योग्य वाटेल ते करावे, असे स्पष्ट मत प्रभास मंडलच्या आईने व्यक्त केले आहे.
 
बरुईपूरचे पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्याच्या घटनास्थळाची पुनर्रचना सुरू असताना प्रभास मंडलने एका पोलिसाचे सर्व्हिस पिस्तूल हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात्मक गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (Bengal Rape Murder Accused)
 
 
 
आपल्या भूमिकेवर ठाम राहत संध्या मंडल (आरोपीची आई) म्हणाल्या, माझ्या मुलाने जे कृत्य केले, त्याची शिक्षा त्याला मिळाली आहे. मी त्याचा मृतदेह स्वीकारणार नाही किंवा घरी आणणार नाही. त्याने कोणतेही चांगले काम केले नव्हते. त्याने अत्यंत भयंकर गुन्हा केला. त्याला त्याची शिक्षा मिळाली. आता पोलिसांनी त्याच्या मृतदेहाचे जे करायचे ते करावे. मला कोणतीही हरकत नाही. (Bengal Rape Murder Accused)
 
 
 
दरम्यान, बरुईपूर पोलीस जिल्ह्याने या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची प्रगती झाल्याचे सांगितले आहे. अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणात आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी जादवपूरच्या खासदार सायोनी घोष यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आल्याची माहिती दिली होती. (Bengal Rape Murder Accused)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर