मुंबई (Avinash Shukla Ram Temple Donation Case) : राम मंदिरातील देणगी गैरव्यवहार प्रकरणात सातत्याने नवे खुलासे होताना दिसत आहेत. दरम्यान, विशेष तपास पथकाने (एसआयटी) आपल्या प्राथमिक अहवालात अविनाश शुक्ला याला या कथित देणगी अपहाराचा मुख्य आरोपी ठरवले आहे. संपूर्ण गैरव्यवहारातील त्याची प्रमुख भूमिका अधोरेखित केली आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, अविनाश शुक्लाच्या जबाबांच्या आधारेच या प्रकरणातील इतर पाच आरोपींची ओळख पटली. तसेच मंदिरातील देणगी मोजणी प्रक्रियेत असलेल्या गंभीर त्रुटींचाही तपासादरम्यान उलगडा झाला. (Avinash Shukla Ram Temple Donation Case)
#WATCH | Ayodhya, UP: Police reaches at Ayodhya Jail to take away three accused in Ram Temple donations embezzlement case.
Ayodhya Police had sought seven-day police custody of three jailed accused—Anukalp Mishra, Lavkush Mishra and Karunesh Pandey. The matter came up for… pic.twitter.com/cF02he9o4n
एसआयटीच्या अहवालानुसार, अविनाश शुक्ला हा त्या सहा आरोपींपैकी पहिला आरोपी आहे, ज्याच्याविरोधातील पुरावे सीसीटीव्ही फुटेज, जप्तीची नोंद, बँक खात्यांची तपासणी आणि साक्षीदारांचे जबाब यांच्या आधारे प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अविनाश शुक्ला देणगी मोजणी दरम्यान अनेक वेळा नोटांची बंडले आणि सुटी रोख रक्कम चोरताना स्पष्टपणे दिसत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. एसआयटीच्या मते, सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा आणि करुणेश पांडे हे अविनाश शुक्लाला देणगीची रक्कम लपविण्यास आणि बाहेर काढण्यास मदत करताना दिसतात. तर मनीष कुमार यादव हा देणगी मोजणी कक्षात त्याच्यासोबत प्रत्यक्ष काम करत असल्याचे दिसून आले आहे. (Avinash Shukla Ram Temple Donation Case)
अयोध्या पोलिसांनी घेतलेल्या झडतीदरम्यान अविनाश शुक्लाकडून २०.३९ लाख रुपये रोख, १,१२१ अमेरिकन डॉलर, सोन्या-चांदीचे दागिने, इतर मौल्यवान वस्तू आणि एक एसयूव्ही वाहन जप्त करण्यात आले. या प्रकरणातील कोणत्याही आरोपीकडून झालेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी जप्ती असल्याचे मानले जात आहे. एसआयटीने या जप्तीला देणगीच्या रकमेतील कथित अपहार सिद्ध करणारा महत्त्वाचा दुवा मानले आहे. (Avinash Shukla Ram Temple Donation Case)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक