घरात रेन वॉटर हार्वेस्टिंग बसवा; पाण्यासोबतच मालमत्ता करही वाचवा! रेन वॉटर हार्वेस्टिंगचे नियम जाणून घ्या

 
Rainwater Harvesting
 
उन्हाळा आला की आपल्याकडे सगळ्यात मोठी चिंता कशाची असते? तर ती पाण्याची! पण विचार करा, जर पावसाचे पाणी वाचवून तुमचे उन्हाळ्यातील टेन्शन कायमचे मिटले आणि सोबतच दरवर्षी भरावा लागणारा टॅक्सही वाचला तर? (Rainwater Harvesting)
 
होय, हे अगदी खरं आहे! आपल्या देशातील सर्वात स्वच्छ शहर, म्हणजेच इंदौरने एक भन्नाट सुवर्णमध्य काढलाय. इंदौर महानगरपालिकेने घोषणा केली आहे की, जे घरमालक आपल्या घरावर 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' बसवतील, त्यांना मालमत्ता करात थेट 10% सूट दिली जाईल! (Rainwater Harvesting)
 
इंदौरमधील नागरिकांचे म्हणणे आहे की, ज्यांनी ही सिस्टीम बसवली आहे, त्यांना मे-जूनच्या कडक उन्हाळ्यातही पाण्याची अजिबात टंचाई भासत नाही. विचार करा, निसर्गाने मोफत दिलेलं पावसाचं पाणी आपण फक्त वाहून जाऊ देतो. पण या पद्धतीमुळे तेच पाणी थेट आपल्या विहिरीत किंवा कूपनलिकेत जाऊन भूजल पातळी वाढवते. म्हणजेच, पाण्याचा प्रश्नही सुटला आणि पालिकेकडून टॅक्समध्ये बोनस सूटही मिळाली! (Rainwater Harvesting)
 
आता तुम्ही म्हणाल, "हे तर इंदौरमध्ये चाललंय, आमच्या महाराष्ट्राचं काय?" (Rainwater Harvesting)
 
तर मित्रांनो, महाराष्ट्रातही असे नियम आहेत, पण बऱ्याच लोकांना याची माहितीच नाही! (Rainwater Harvesting)
 
मुंबई आणि पुण्यात नवीन इमारतींसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक आहे. पुणे महानगरपालिका ही सिस्टीम यशस्वीरीत्या राबवणाऱ्या सोसायट्यांना मालमत्ता करात 5 ते 10 टक्क्यांपर्यंत सवलत देते. शिवाय ३०० चौ. मीटर किंवा त्यापेक्षा जास्त भूखंड क्षेत्र असलेल्या सर्व नवीन इमारतींना ही सिस्टीम बसवणे अनिवार्य आहे. (Rainwater Harvesting)
 
पुण्यात तर, २००६ पासून सर्व नवीन इमारतींसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करण्यात आलयं. जर गृहनिर्माण सोसायटीने रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा किंवा कचरा व्यवस्थापन यापैकी कोणताही एक प्रकल्प राबवला, तर त्यांच्या सामान्य करावर 5% सवलत मिळते आणि जर सोसायटीने यापैकी कोणतेही दोन किंवा अधिक प्रकल्प यशस्वीरीत्या राबवले, तर त्यांना एकूण मालमत्ता करावर 10% सवलत दिली जाते. पुण्याची 'विश्रांतवाडी' आणि मुंबईतील काही सोसायट्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून दरमहा लागणाऱ्या हजारो रुपयांच्या पाण्याच्या टँकरचा खर्च शून्यावर आणला आहे! (Rainwater Harvesting)
 
थोडक्यात काय तर, रेन वॉटर हार्वेस्टिंग हा केवळ निसर्गाचा फायदा नाही, तर आपल्या खिशाचाही फायदा आहे. आजच तुमच्या स्थानिक महानगरपालिकेत किंवा ग्रामपंचायतीत चौकशी करा की तुमच्या भागात यासाठी किती टॅक्स सवलत मिळतेय. (Rainwater Harvesting)
 
चला तर मग, या पावसाळ्यात फक्त पाऊस एन्जॉय करू नका, तर तो घरात साठवायलाही सुरुवात करा. आणि पाण्यासोबतच, टॅक्सही वाचवा! (Rainwater Harvesting)]
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर