मुंबई : (Mumbai Water Reservoir Level) मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांच्या क्षेत्रात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला असून, मुंबईकरांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे. मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आज (दि.६) सकाळी ६ वाजेपर्यंत १६.९२ टक्के (२,४४,९०० दशलक्ष लिटर) उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षीच्या (२०२५) ५९.५६ टक्के च्या तुलनेत हा साठा सध्या कमी असला, तरी गेल्या दोन दिवसांतील जोरदार पावसामुळे पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे.सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'तुळशी तलाव' तब्बल ८२.१४ टक्के भरला असून तो ओसंडून वाहण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
धरण क्षेत्रात २४ तासांत धुवांधार पाऊस :
गेल्या २४ तासांत सर्वच जलवाहिन्यांच्या आणि धरणांच्या कॅचमेंट एरियामध्ये जोरदार पाऊस नोंदवला गेला.तुळशी तलाव येथे सर्वाधिक २८७ मिमी पावसाची नोंद झाली असून तलावाची पातळी १३८.०८ मीटरवर पोहोचली आहे.
विहार तलाव येथे २१३ मिमी पाऊस झाला असून साठा ९०.६१ टक्के वर गेला आहे.मुंबईला सर्वाधिक पाणी देणाऱ्या भातसा क्षेत्रात १६५ मिमी पाऊस झाला असून, धरणाची पातळी २.१० मीटरने वाढली आहे.तानसा धरण क्षेत्रात १४२ मिमी पाऊस झाला असून साठा ०.७५ मिटर ने वाढला आहे. तर मोडक सागरमध्ये १०१ मिमी पावसाची नोंद झाली असून साठा ९.९१ तर मध्य वैतरणा परिसरात ८७ मिमी पाऊस झाला असून पाणी पातळी १.९० मीटरने वाढली आहे. अप्पर वैतरणात ४० मिमी पाऊस झाला असून पाणी पातळी सर्वात कमी ०.०६ मीटर ने वाढली आहे.(Mumbai Water Reservoir Level)
भांडुप कॉम्प्लेक्स जलशुद्धीकरण केंद्र परिसरात आज १४५ मिमी पाऊस पडला असून, येथील या मोसमातील एकूण पाऊस १४६२ मिमीवर पोहोचला आहे. सध्या पावसाचा जोर पाहता आगामी ४-५ दिवसांत मुंबईच्या पाणीसाठ्यात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता पालिकेच्या जलअभियंता विभागाने व्यक्त केली आहे.(Mumbai Water Reservoir Level)
धरणांमधील आजची उपयुक्त पाणीसाठ्याची स्थिती (दशलक्ष लिटरमध्ये):
तलाव/उपयुक्त साठा/टक्केवारी (%)२४ तासांतील वाढ (मीटर)