मुंबई : (Mumbai Pune Connecting Link) मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक मार्गाच्या बोगदा क्रमांक दोन या ठिकाणी मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. महामार्ग परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात अतिवृष्टीमुळे या भागात अचानक पाण्याचा प्रवाह आल्याने डोंगरावरील दगड आणि माती चिखल हा वेगात कोसळला. तब्बल 100 टन मलबा अचानक बोगद्याच्या एक्झिट मार्गावर येऊन कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र रात्री दहाच्या सुमारास हा मलबा हटवून हा मार्ग सुरक्षितरित्या पूर्ववत करण्यात प्रशासनाला यश आले.
दरम्यान या दुर्घटनेनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरले. महामार्गातील बोगद्यांचे किंवा पुलाचे कोणतेही नुकसान झालेले नसतानाही विरोधकांकडून रस्त्याची हानी झाल्याचे असत्य पसरवण्यात आले. मात्र अवघ्या काही तासात प्रशासनाला 100 टन मलबा हटवण्यात यश मिळाले. मलबा हटवल्यानंतर महामार्गाची सुरक्षितता तपासून त्यानंतरच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हा रस्ता वाहतुकीसाठी सोमवार दि. 6 रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. महामार्ग, आणि मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक पुन्हा एकदा वाहतुकीसाठी सुरक्षितरीत्या सुरू झाल्याकारणाने विरोधकांनी दिवसभर चालवलेले फेक नरेटीव काही तासातच खोडून निघाले. (Mumbai Pune Connecting Link)
🚨 IMPORTANT UPDATE
✅ Traffic has resumed on the Pune–Mumbai Connecting Link Road. Vehicular movement has been restored after completion of extensive safety operations.
Despite relentless monsoon conditions, including heavy rainfall, strong winds and low visibility, MSRDC… pic.twitter.com/LCRirbWao0
असे असले तरीही प्रशासनाकडून पुढील 48 तास अतिवृष्टी किंवा ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याकारणाने नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. लांब पल्ल्याचा प्रवास टाळावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Mumbai Pune Connecting Link)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.