मुंबई : (Mumbai Rain BEST Bus) मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बेस्टच्या बसवाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अनेक ठिकाणी पाणी साचणे आणि झाडे कोसळल्याने काही रस्ते बंद करावे लागले. त्यामुळे अंधेरी, भांडुप, अँटॉप हिल, कुलाबा, मुलुंड, गोरेगाव तसेच दक्षिण मुंबईतील विविध भागांमध्ये बससेवा विस्कळीत झाली असून अनेक बसमार्गांमध्ये तात्पुरते बदल करण्यात आले.
बेस्ट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरीतील स्वीट कॉर्नर आणि अजित ग्लास परिसरात पाणी साचल्यामुळे मार्ग क्रमांक २०२, ३५९, ४, ८४ आणि २५६ या बस बहराम बाग मार्गे वळविण्यात आल्या. पश्चिम भांडुपमध्ये शिवाजी तलाव परिसरासह विविध ठिकाणी झाडे पडल्याने मार्ग क्रमांक ६०६, ६०४, ६०५, ३०७ आणि ४०९ या बसांचे मार्ग बदलण्यात आले.
अंधेरीतील कापसवाडी येथे झाड कोसळल्यामुळे मार्ग क्रमांक ५६, २०० आणि २२१ या बसमार्गांवर काही काळ एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली. तसेच विद्याविहारमधील डॉन बॉस्को हायस्कूल परिसरात पाणी साचल्याने मार्ग क्रमांक ३२२ वरील बस पर्यायी मार्गाने चालविण्यात आल्या.(Mumbai Rain BEST Bus)
अँटॉप हिलमधील संगम नगर येथे झाड पडल्यामुळे मार्ग क्रमांक १४, १५, ८८, ११०, ११७, १७२, १७४ आणि १७५ या बससेवांवर परिणाम झाला. वर्सोव्यातील यारी रोड तसेच कुलाब्यातील शहीद भगतसिंग रोड येथे झाडे कोसळल्यानेही अनेक बसमार्गांवर वाहतूक विस्कळीत झाली.(Mumbai Rain BEST Bus)
याशिवाय मुलुंड, गोरेगाव, कुलाबा आणि दक्षिण मुंबईतील इतर काही भागांतही झाडे पडणे व रस्ते बंद झाल्यामुळे बेस्टने अनेक मार्गांमध्ये बदल केले आहेत. दरम्यान, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाची पथके युद्धपातळीवर मलबा हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत आहेत.(Mumbai Rain BEST Bus)