मुंबई: (Maharashtra Bike Taxi) महाराष्ट्रातील बाईक-टॅक्सी चालकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. आता राज्यात बाईक-टॅक्सीचा परवाना मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्र अनिवार्य असणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत ही घोषणा करत अनधिकृत प्रवासी वाहतूक, महिला सुरक्षेचे प्रश्न आणि परप्रांतीय चालकांच्या वाढत्या सहभागाच्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. (Maharashtra Bike Taxi)
राज्यात गेल्या काही वर्षांत बाईक-टॅक्सी सेवांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिक या सेवांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. मात्र, या क्षेत्रात विनापरवाना वाहतूक, चालकांची पडताळणी आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत होते. (Maharashtra Bike Taxi)
आमदारांनी उपस्थित केला सुरक्षेचा मुद्दा
या विषयावर चर्चा सुरू करताना शिवसेना (शिंदे गट)चे आमदार दिलीप लांडे यांनी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बाईक-टॅक्सी सुरू असल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. अनेक चालकांकडे वैध परवाना, आवश्यक कागदपत्रे किंवा पोलीस पडताळणी नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे विशेषतः महिला, विद्यार्थिनी आणि एकट्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. (Maharashtra Bike Taxi)
परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा
या चर्चेला उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "राज्यात बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. अनेक जण इतर राज्यांतून महाराष्ट्रात येऊन बाईक खरेदी करतात आणि कोणतीही अधिकृत परवानगी न घेता प्रवासी वाहतूक सुरू करतात. हा प्रकार थांबवण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे महाराष्ट्राचे डोमिसाईल प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीलाच बाईक-टॅक्सी परवाना दिला जाईल." (Maharashtra Bike Taxi)
त्यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच बेकायदेशीर वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठीही महत्त्वाचा ठरेल. (Maharashtra Bike Taxi)
सरकारला काय अपेक्षा आहे?
राज्य सरकारच्या मते, या निर्णयामुळे अनेक सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Bike Taxi)
बेकायदेशीर बाईक-टॅक्सी सेवांवर नियंत्रण मिळवता येईल.
चालकांची ओळख आणि पोलीस पडताळणी अधिक प्रभावीपणे करता येईल.
महिला आणि प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ होईल.
स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील.
शासनाच्या महसुलात वाढ होण्यास मदत होईल.
मात्र, डोमिसाईल प्रमाणपत्राची अट नेमकी कधीपासून लागू होणार, विद्यमान चालकांना सवलत मिळणार का, ऑनलाइन अॅप-आधारित कंपन्यांवर हा नियम कसा लागू होणार आणि परवाना प्रक्रिया कशी असेल, याबाबतचे सविस्तर नियम सरकारकडून अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीसंदर्भातील अधिकृत अधिसूचनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Bike Taxi)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.