जेएनपीए कंटेनर टर्मिनलमध्ये अपघात; एका कर्मचाऱ्याचा मृत्यू, एक जखमी

JNPA Container Terminal Accident
 
मुंबई : (JNPA Container Terminal Accident) जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) अंतर्गत कार्यरत असलेल्या एनएसएफटी कंटेनर टर्मिनलमध्ये रविवारी (६ जुलै) पहाटे कंटेनर हाताळणीदरम्यान झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला.
 
जेएनपीए प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, रिकामे कंटेनर वेस्ट ऑइल रिमूव्हल टँकरवर कोसळल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी व्यक्तीवर जेएनपीए रुग्णालयात उपचार करण्यात आले असून उपचारानंतर त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. या घटनेबद्दल जेएनपीएने तीव्र दुःख व्यक्त करत मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच बाधित कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत करण्यात येत असल्याचेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.(JNPA Container Terminal Accident)
 
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी सविस्तर चौकशी आणि मूळ कारणांचा (Root Cause Analysis) तपास सुरू करण्यात आला आहे. जेएनपीएच्या सर्व कंटेनर टर्मिनलमध्ये निर्धारित कार्यपद्धती आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोर पालन केले जात असून, कोणत्याही प्रकारची नियमभंगाची बाब निदर्शनास आलेली नसल्याचे जेएनपीएने निवेदनात म्हटले आहे. तसेच सर्व टर्मिनलमध्ये आवश्यक सुरक्षा उपाय सातत्याने राबविले जात असल्याचेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.(JNPA Container Terminal Accident)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर