चर्मोद्योग कामगार सेनेचा संत रोहिदास दिंडीतील वारकऱ्यांना मदतीचा हात

    07-Jul-2026   
Charmodyog Kamgar Sena
 
मुंबई : (Charmodyog Kamgar Sena) मुंबई ते पंढरपूर पायी निघालेल्या संत रोहिदास दिंडी क्र. २४ मधील वारकरी बांधवांना चर्मोद्योग कामगार सेनेच्या वतीने वारीसाठी आवश्यक साहित्य, रेनकोट, छत्र्या तसेच अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले. हा उपक्रम दादर येथील चर्मोद्योग कामगार सेनेच्या कार्यालयात पार पडला.
 
सोमवार, २९ जून रोजी संत रोहिदास दिंडी क्र. २४ चे मुंबईहून पंढरपूरकडे उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले. परंपरेनुसार सायंकाळच्या विश्रांतीसाठी दिंडी दादर येथील चर्मोद्योग कामगार सेनेच्या कार्यालयात दाखल झाली. यावेळी चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष मयुर चंद्रकांत कांबळे यांच्या हस्ते वारकरी बांधवांना वारीदरम्यान उपयोगी पडणाऱ्या विविध वस्तू, रेनकोट, छत्र्या आणि अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.(Charmodyog Kamgar Sena)
 
याप्रसंगी रेखा कांबळे, भास्कर गद्रे, भटू अहिरे, रमेश धाकराव, हेमंत झिंजुर्डे, विनोद सातपुते, बाबूभाई, ह.भ.प. नारायण महाराज पाटील, ह.भ.प. चंद्रकांत महाराज कारंडे यांच्यासह शेकडो वारकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमात वारकऱ्यांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या या उपक्रमाची नोंद उपस्थितांनी समाधानाने घेतली असल्याचे सांगण्यात आले.(Charmodyog Kamgar Sena)
 
 




सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.
संबंधित मजकूर