मुंबई : (Bhatke Vimukt Vikas Parishad) मुंबईमध्ये भटके विमुक्त समाजाच्या वस्त्या आहेत. हातावर पोट असलेला समाज अत्यंत कठिण परिसस्थिती रस्त्यावरही राहताना दिसतो. जून महिन्याच्या अखेरीपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे समाजबांधवाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली.
त्यामुळेच भटके विमुक्तम विकास परिषदेतर्पे पावसामुळे अत्यंत कठीण परिस्थितीत असलेल्या गरजू भटके विमुक्त बांधवांना ताडपत्रीचे वाटप करण्यात आले. दि. ०४-जुलै रोजी राहुल चव्हाण आणि नरेश पोटे यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने हा उपक्रम मुंबादेवी व सिद्धिविनायक भागात हा सेवा उपक्रम राबविण्यात आला. या सेवाकार्यात भटके विमुक्त विकास परिषद, कोकण प्रांत यांचे शासकीय योजना प्रमुख, मुंबादेवी भाग संयोजक व सहसंयोजक तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
मुसळधार पावसात उघड्यावर राहणार्या गरजू बांधवांना तात्पुरता आसरा मिळावा व त्यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी व्हाव्यात, या उद्देशाने हा सेवा उपक्रम राबविण्यात आला. समाजातील गरजू व वंचित घटकांच्या सेवेसाठी भटके विमुक्त विकास परिषद सातत्याने कार्यरत असून, अशा सेवाकार्यांद्वारे समाजाप्रती आपली बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत आहे.
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.