मृत्यूवर हसलो नाही'; दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओवर अमीत साटमांचा आक्षेप, चौकशीची मागणी

Ameet Satam Misleading Video
 
मुंबई: (Ameet Satam Misleading Video) विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना आपल्या वक्तव्याचा दिशाभूल करणारा व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत भाजप आमदार आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी विधानसभेत केली.
 
सभागृहात बोलताना साटम म्हणाले की, विधानभवनाच्या पायऱ्यांसमोर माध्यमांचे कॅमेरे कायमस्वरूपी लावलेले असतात. मागील आठवड्यात माध्यमांशी बोलत असताना आमदार जयंत पाटील तेथे आले होते. त्यावेळी दोघांमध्ये एका वेगळ्याच विषयावर हलक्या-फुलक्या स्वरूपात चर्चा झाली आणि त्यानंतर जयंत पाटील तेथून निघून गेले.
 
मात्र, एका वृत्तवाहिनीने त्या संभाषणातील केवळ काही सेकंदांचा भाग दाखवत आपण मृत्यूच्या घटनेवर हसल्याचा चुकीचा आभास निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला. "मी मृत्यूवर हसलो नाही. हे जयंत पाटील यांनाही माहिती आहे. आमच्यातील संभाषण वेगळ्या विषयावर होते. मात्र त्यातील केवळ एक छोटा भाग दाखवून चुकीचा संदेश समाजात पोहोचवण्यात आला," असे साटम यांनी स्पष्ट केले.(Ameet Satam Misleading Video)
 
या घटनेकडे केवळ वैयक्तिक प्रकरण म्हणून न पाहता लोकशाही संस्थांच्या दृष्टीने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. "आज माझ्यासोबत ही घटना घडली आहे; उद्या विधानसभेतील कोणत्याही २८८ सदस्यांसोबत अशीच घटना घडू शकते. त्यामुळे अशा दिशाभूल करणाऱ्या संपादित (एडिटेड) व्हिडिओंवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी सभागृहाने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे," अशी मागणी त्यांनी केली.(Ameet Satam Misleading Video)
 
याप्रकरणी चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणीही अमित साटम यांनी सभागृहात केली.(Ameet Satam Misleading Video)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर