उबाठाच्या राम रक्षा आंदोलनास तुरळक प्रतिसाद

    06-Jul-2026
UBT Ram Raksha Andolan
 
मुंबई : (UBT Ram Raksha Andolan) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सेनेच्या वतीने दादर येथील कबुतर खानाजवळील हनुमान मंदिर परिसरात राम रक्षा आंदोलन रविवार दि.५ रोजी करण्यात आले.पण ढिसाळ नियोजनाने व तुरळक प्रतिसादाने आंदोलन फसलेले पाहायला मिळाले.एक महिला आंदोलन स्थळी भाजपची छत्री घेऊन आलेली होती.तर काही ठिकाणी मनसेचे पोस्टर असलेल्या छत्र्या पहायला मिळाल्या.
 
आंदोलन समाप्ती वेळी उबाठाच्या मुंबई महापालिकेतील नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आंदोलन झाल्यावर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाआरती होईल असे सांगत लोकांनी जाऊ नये, आहे तिथेच थांबावे असे आवाहन केले तरी सहभागी लोक थांबत न्हवते. त्याचवेळी खासदार अरविंद सावंत यांनी किशोरी पेडणेकर यांच्या हातातील माईक घेत लोकांना जागेवर उभे राहण्याचे आवाहन केले व राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपेल असे सांगितले. अरविंद सावंत आणि किशोरी पेडणेकर यांच्यातील हा विसंवाद यावेळी पाहायला मिळाला.(UBT Ram Raksha Andolan)
 
अरविंद सावंत यांनी राष्ट्रगीत सुरू करताच दुसऱ्या माईक वरून हॅलो हॅलो असे बोलले जाऊ लागले.उद्धव ठाकरे यांच्या मुख्य महाआरतीवेळी मात्र बहुतांशी लोक अनुपस्थित होते. एकंदर रामरक्षा आंदोलनास म्हणावा तेवढा प्रतिसाद पाहायला मिळाला नाही.(UBT Ram Raksha Andolan)
 
 




संबंधित मजकूर