मुंबई: (Mumbai Red Alert) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी सोमवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन करत नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आणि शक्यतो सर्व प्रकारचा प्रवास टाळण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री म्हणाले की, आजचा दिवस पाऊस आणि पूरपरिस्थितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. दुपारनंतर अनेक भागांत ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून झाडे पडणे आणि इतर दुर्घटना घडण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. विशेषतः तरुणांनी पर्यटनासाठी धबधबे, घाट परिसर किंवा इतर धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे त्यांनी स्पष्ट केले. (Mumbai Red Alert)
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ते राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात जाऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार असून मंगळवारी सभागृहात याबाबत सविस्तर निवेदन सादर करतील. राज्य सरकारने सर्व आवश्यक तयारी केली असून गेल्या दोन दिवसांत धोकादायक ठिकाणांवरील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकारी यंत्रणा कमी पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. (Mumbai Red Alert)
गेल्या काही दिवसांत घडलेल्या दुर्घटनांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, प्रशासनाने पूर्वतयारी केली होती. मात्र बदलत्या हवामानामुळे अपेक्षेपेक्षा वेगळ्या घटना घडत आहेत. अशा घटनांकडे राजकारणाच्या दृष्टीने न पाहता संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Mumbai Red Alert)
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक तात्काळ बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. काही प्रवासी अजूनही विविध ठिकाणी अडकले असून त्यांना पर्यायी मार्गाने सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यभरात अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्त्यांवर पाणी साचणे आणि वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्याने सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Mumbai Red Alert)
दरम्यान, मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) बांधकाम स्थळांसाठी विशेष सुरक्षा मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. विकासक, कंत्राटदार आणि अभियंत्यांना तात्पुरत्या संरचना, स्कॅफोल्डिंग, क्रेन, फॉर्मवर्क, सुरक्षा जाळ्या आणि इतर उपकरणांची तातडीने तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Mumbai Red Alert)
महापालिकेने उंचावरील मजल्यांवर किंवा टेरेसवर ठेवलेले सुटे साहित्य सुरक्षितपणे हटविणे किंवा बांधून ठेवणे, धोकादायक हवामानात क्रेन व उंचावरील सर्व कामे तात्काळ थांबविणे, खोदकामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे तसेच सर्व कामगारांनी वैयक्तिक सुरक्षा साधनांचा (PPE) वापर करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. (Mumbai Red Alert)
हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, अधिकृत सूचना पाळण्याचे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. (Mumbai Red Alert)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.