मुंबईतील शासकीय कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचे सरकारचे आदेश

    06-Jul-2026   
Mumbai Red Alert
 
मुंबई: (Mumbai Red Alert) राज्यभरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजला असून सोमवारी, मुंबईतील अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते. या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि मुंबईतील शासकीय कार्यालयतील कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसांत कार्यालय सोडण्याचे तर, खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होम करण्याचे निर्देश सरकारने दिले. सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले.(Mumbai Red Alert)
 
भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) जारी केला असून ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी मुंबईतील सर्व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे (वर्क फ्रॉम होम) निर्देश दिले आहेत. तसेच, शासनातील अत्यावश्यक विभाग वगळता कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली.(Mumbai Red Alert)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर