मुंबई: (CM Devendra Fadnavis weather warning) राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ६ जुलै रोजी विधानसभेत निवेदन केले. मुंबईसह राज्यातील विविध भागांत घडलेल्या दुर्घटनांचा आढावा घेत त्यांनी नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले. विशेषतः मुंबईत एका दिवसात तब्बल ३५० झाडे कोसळल्याची माहिती देत आजची परिस्थिती आणखी गंभीर असल्याचा इशारा त्यांनी दिला. (CM Devendra Fadnavis weather warning)
मुख्यमंत्री म्हणाले, "दरवर्षी मान्सूनच्या काळात मुंबईत सरासरी ८०० झाडे कोसळतात. मात्र, काल एकाच दिवसात ३५० झाडे पडली. ही अत्यंत अनपेक्षित आणि गंभीर परिस्थिती आहे. निसर्गाचे स्वरूप बदलत असून प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करत आहे." (CM Devendra Fadnavis weather warning)
ते पुढे म्हणाले की, काल मुंबईत ताशी सुमारे ५० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. मात्र आज दुपारनंतर वाऱ्याचा वेग ताशी ७० ते ९० किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी शक्यतो घरातूनच काम (वर्क फ्रॉम होम) करण्याचा पर्याय स्वीकारावा आणि अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये. (CM Devendra Fadnavis weather warning)
मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली असून मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरही सेवा विस्कळीत झाली आहे. प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून आवश्यक त्या उपाययोजना राबवत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. (CM Devendra Fadnavis weather warning)
दरम्यान, गेल्या काही दिवसांत मुंबईत झाडे कोसळण्याच्या अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर दहा विद्यार्थी जखमी झाले. दादर-माटुंगा परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली असून माटुंगा येथील मनीज परिसरात झाड कोसळून काही वाहनांचे नुकसान झाले. कुर्ला नौपाडा येथे झाड कोसळल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला. याशिवाय वांद्रे, अंधेरी आणि कुर्ला परिसरातही झाडे पडण्याच्या अनेक घटना नोंदविण्यात आल्या आहेत. (CM Devendra Fadnavis weather warning)
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आज वाऱ्याचा वेग आणखी वाढण्याची शक्यता असल्याने झाडे पडणे, फलक कोसळणे आणि इतर दुर्घटना घडण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, सुरक्षित ठिकाणी राहावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ संबंधित यंत्रणांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. (CM Devendra Fadnavis weather warning)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.