Maharashtra Heavy Rain Live Update: मुसळधार पावसाने महाराष्ट्र ठप्प; मुंबई-पुणे मार्ग बंद, विधिमंडळाचे आजचे कामकाजही स्थगित, राज्यात कुठे काय परिस्थिती सविस्तर वाचा



 
Maharashtra Heavy Rain Live Update
 
मुंबई: (Maharashtra Heavy Rain Live Update) महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणासह अनेक भागांत अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. सलग तिसऱ्या दिवशी मुंबई, ठाणे आणि पुण्यासाठी रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचणे, दरडी कोसळणे आणि झाडे पडण्याच्या घटनांमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. (Maharashtra Heavy Rain Live Update)
 
मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याची घटना... (Maharashtra Heavy Rain Live Update)
 
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या घटनेचा फटका विधानसभेच्या अधिवेशनासाठी मुंबईकडे निघालेल्या अनेक आमदारांनाही बसला. आमदार हेमंत रासने, सिद्धार्थ शिरोळे आणि भीमराव तापकीर यांना प्रवास अर्धवट सोडून पुण्यात परतावे लागले. (Maharashtra Heavy Rain Live Update)
 

पुणे मुंबई दरम्यानची एसटी वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद (Maharashtra Heavy Rain Live Update)
 
दरड कोसळल्यामुळे पुणे-मुंबई दरम्यानची एसटी बस सेवा पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. सकाळी मुंबईकडे निघालेल्या चार एसटी बस उर्से टोलनाका परिसरात अडकल्या होत्या. त्यांना सुरक्षितपणे पुण्यात परत पाठवण्यात आले असून प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केले आहे. (Maharashtra Heavy Rain Live Update)

पावसामुळे राज्य विधिमंडळाचे कामकाजही स्थगित (Maharashtra Heavy Rain Live Update)
 
पावसाच्या तीव्रतेमुळे राज्य विधिमंडळाचे कामकाजही आज स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान, सातारा–महाबळेश्वर मार्गावरही दरड कोसळल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. (Maharashtra Heavy Rain Live Update)
 
झाडे कोसळण्याची मालिका सुरूच... (Maharashtra Heavy Rain Live Update)
 
मुंबईतही पावसामुळे दुर्घटनांची मालिका सुरूच आहे. काळाचौकीतील आंबेवाडी परिसरात झाड कोसळून एका खासगी वाहनाचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दल आणि महापालिकेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. (Maharashtra Heavy Rain Live Update)
 

मुख्यमंत्र्यांकडून नागरीकांना आवाहन (Maharashtra Heavy Rain Live Update)
 
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. "आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. शक्यतो सर्वांनी प्रवास टाळावा. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. निसर्गाचे स्वरूप बदलले असून प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे," असे त्यांनी सांगितले. तसेच ते दुपारी १२ वाजता राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. (Maharashtra Heavy Rain Live Update)
 

८०KM वेगानं सोसाट्याचे वारे वाहणार (Maharashtra Heavy Rain Live Update)
 
हवामान विभागाने राज्यातील काही भागांत ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला असून नागरिकांनी झाडे, होर्डिंग्ज आणि विद्युत तारा यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Heavy Rain Live Update)
 

कर्जत–खोपोली उपनगरीय रेल्वे सेवा बंद (Maharashtra Heavy Rain Live Update)
 
रेल्वे वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. कर्जत–खोपोली उपनगरीय रेल्वे सेवा रुळाखालची खडी वाहून गेल्यामुळे बंद ठेवण्यात आली आहे. मात्र मुख्य मार्ग, हार्बर, ट्रान्स-हार्बर आणि पोर्ट मार्गावरील लोकल सेवा सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. (Maharashtra Heavy Rain Live Update)
 
राज्यभरात प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि बचाव पथके सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Heavy Rain Live Update)


 

 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर