राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष अलर्ट मोडवर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला आढावा

Maharashtra Disaster Management Alert
 
मुंबई : (Maharashtra Disaster Management Alert) राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाचा आढावा घेत राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली. राज्यातील संवेदनशील भागांमध्ये एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकांचे पुनर्नियोजन (रिडिप्लॉयमेंट) करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या अतिरिक्त एनडीआरएफ पथके मागविण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
मुख्यमंत्री म्हणाले की, पावसाचा अंदाज लक्षात घेऊन आषाढी वारीसाठीही विशेष नियोजन करण्यात आले आहे. वारकरी मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदी येथे एकत्र न येता पुण्यातून नियोजनबद्ध मार्गाने पुढे गेल्यास गर्दी कमी होईल आणि संभाव्य आपत्ती टाळता येईल. तसेच वारकऱ्यांसाठी जास्तीत जास्त जर्मन हँगर्स उभारून त्यांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी त्यांनी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा २४ तास कार्यरत असल्याचे सांगितले. (Maharashtra Disaster Management Alert)
 
 
 
मुख्यमंत्री म्हणाले, "ही आपली जी काही डिझास्टर मॅनेजमेंटची जी आपली इथला जो कक्ष आहे हा कक्ष 24 तास या ठिकाणी काम करतोय. आपल्या ज्या सचिव आहेत, सचिव महोदय असतील, सगळी इथली टीम असेल हे सातत्याने सगळ्या जिल्ह्यांची, सगळ्या विभागांची आणि अगदी गाव पातळीपर्यंतचे अलर्ट्स आपल्याकडे आहेत ते गाव पातळीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे या कक्षातून होत आहे. सोबत बीएमसीचा कक्ष देखील त्याच पद्धतीने काम करतो आहे." (Maharashtra Disaster Management Alert)
 
नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना हवामान खात्याच्या इशाऱ्यांचे पालन करण्याचे आवाहन केले. "माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक, अत्यावश्यक नसलेला प्रवास टाळावा. जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगाने धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं. अत्यावश्यक असल्याशिवाय लोकांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीने कम्युटेशन करू नये." राज्यात काही प्रमाणात जीवितहानी झाल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र त्यासंदर्भातील माहिती यापूर्वीच देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (Maharashtra Disaster Management Alert)
 
एनडीआरएफ-एसडीआरएफचे पुनर्नियोजन
 
राज्यातील हवामानाचा अंदाज आणि संभाव्य धोक्याचा विचार करून एनडीआरएफची पथके संवेदनशील भागांमध्ये हलविण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. "उद्याच्या घटनांचा विचार करून किंवा आठ तारखेपर्यंतचा व्हल्नरेबल एरिया कुठला आहे त्याचा विचार करून एनडीआरएफ त्या त्या भागांमध्ये हलवण्यात आलेली आहे. मग जिथून एनडीआरएफ हलवली आहे, तिथेही धोका निर्माण होऊ नये म्हणून एसडीआरएफ आपण नेमलेली आहे. त्यामुळे तशा पद्धतीचं डिप्लॉयमेंट जे काही अलर्ट आहे त्या अलर्टवर आधारित डिझास्टर मॅनेजमेंट कक्षाने केलेलं आहे."
 
अतिरिक्त एनडीआरएफ पथके मागविण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करताना ते म्हणाले, "आत्ता तरी अतिरिक्त बोलवण्याची आवश्यकता नाहीये. जी पथकं आहेत त्याचीच रिडिप्लॉयमेंट आपण करतो आहोत. जो काही वेदर डेटा आहे आणि जे काही अलर्ट्स आहेत त्याच्या आधारावर पुरेसं डिप्लॉयमेंट केलं आहे." (Maharashtra Disaster Management Alert)
 
शाळांबाबतचा निर्णय संध्याकाळी
 
शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी द्यायची की नाही याचा निर्णय हवामानाच्या अद्ययावत माहितीनंतर घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. "उद्याच्या संदर्भात आज संध्याकाळपर्यंत आपण त्याचा निर्णय घेतो. आपल्याकडे लॉंग टर्म फोरकास्टचा डेटा आहेच, पण संध्याकाळपर्यंत तो कोलेट करून त्याच्या आधारावर निर्णय केला जाईल." (Maharashtra Disaster Management Alert)
 
खासगी कार्यालयांनी जबाबदारी स्वीकारावी
 
खासगी कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'ची सुविधा देण्याचे आवाहन करत मुख्यमंत्री म्हणाले, "मला असं वाटतं की आपले जे काही कर्मचारी आहेत त्यांची जबाबदारी ही खाजगी कार्यालयांनी स्वीकारली पाहिजे. आपल्या कर्मचाऱ्यांच्या जीविताची, त्यांच्या एकूण सगळ्या गोष्टींची जबाबदारी ही सगळ्या अस्थापनांची आहे आणि हा मानवतेचा धर्म आहे. याच्यामध्ये कायदा, बडगा किंवा जीआर यापेक्षा मानवतेच्या दृष्टिकोनातून ज्यावेळी अशा प्रकारचे आपण अलर्ट देतो त्यावेळी त्यांनी देखील त्याला रिस्पॉन्ड केले पाहिजे." अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आल्याचे सांगून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कार्यालयांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. (Maharashtra Disaster Management Alert)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर