मुंबई : (Indrayani River Danger Level) राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका आळंदीला मोठ्या प्रमाणात बसलाय. इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अशी माहिती आहे की, सुमारे २५० नागरिक विविध ठिकाणी अडकले आहेत आणि त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.(Indrayani River Danger Level)
प्रशासनाने देखील सुरक्षेच्या कारणास्तव आळंदी शहरातील इंद्रायणी नदीवरील चार पूल तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भाविक, वारकरी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. वारीला सुरुवात होणार असून वारकऱ्यांनी देखील बंद करण्यात आलेल्या पुलांवरून किंवा प्रतिबंधित भागातून जाण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा धोका वाढू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.(Indrayani River Danger Level)
इंद्रायणीला आलेल्या पुरामुळे सोमवारी सकाळी आळंदी विविध धर्मशाळा तसेच दर्शन मंडपातील अडकलेले अडीचशे वारकऱ्यांना आता नगर परिषदेच्या आपत्कालीन विभागाकडून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहेत. इंद्रायणी काठावरील वारीसाठी महिलांना कपडे बदलण्यासाठी तयार केलेला दोन चेंजिंग रूम पाण्यामध्ये वाहून गेले. दर्शन मंडपाची दर्शन बारी पुराच्या पाण्यात वाहून गेली. त्याचबरोबर जुन्या व नवीन पुलाच्या संरक्षण कठडे आणि त्याला बसवण्यात आलेली जाळी बऱ्याच प्रमाणात वाहून गेले आहेत.(Indrayani River Danger Level)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक