थायलंडमध्ये सापडल्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या सोन्याच्या अंगठ्या; ब्राह्मी लिपीने उलगडला भारताशी संबंध

 
 
Indian Gold Rings Found in Thailand
 
बँकॉक (Indian Gold Rings Found in Thailand) : थायलंडच्या फेत्चाबुरी प्रांतातील डॉन-याई थोंग या प्राचीन स्थळावरील उत्खननादरम्यान सुमारे दोन हजार वर्षे जुन्या सोन्याच्या अंगठ्या सापडल्या आहेत. थायलंडच्या पुरातत्त्व विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या अंगठ्यांवर प्राचीन ब्राह्मी लिपीमध्ये काही शब्द कोरलेले आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पुरातत्त्व विभागाकडून प्राचीन मानवी अवशेष आणि इतर ऐतिहासिक वस्तूंचा शोध घेण्यासाठी उत्खनन सुरू होते. त्यादरम्यान संशोधकांना सोन्याच्या दोन अंगठ्या सापडल्या. या ठिकाणी पूर्वी दफनभूमी असल्याचे मानले जाते. तसेच, या अंगठ्यांचा संबंध प्राचीन भारतीय समुदायाशी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  (Indian Gold Rings Found in Thailand)
 
या शोधावरून भारत आणि दक्षिण-पूर्व आशियामधील व्यापारी तसेच सांस्कृतिक संबंध सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीपासून असल्याचे संकेत मिळतात. पुरातत्त्व विभागाच्या माहितीनुसार, यापूर्वीही याच ठिकाणी ब्राह्मी लिपीतील लेख असलेल्या अनेक प्राचीन वस्तूंचे अवशेष सापडले होते.  (Indian Gold Rings Found in Thailand)
 
सध्या या दोन्ही अंगठ्या थायलंडच्या फ्रा नखोन खीरी वस्तुसंग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. पुरातत्त्व विभागाकडून या ठिकाणी उत्खननाचे काम सुरू असून, भविष्यात आणखी महत्त्वाच्या प्राचीन वस्तू सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  (Indian Gold Rings Found in Thailand)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर