मुंबई :(Devendra Fadnavis Connecting Link Response) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक मार्गातील बोगदा 2 जवळ पहाटेच्या सुमारास दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. दरम्यान या घटनेत प्रकल्पातील पूल, रस्ते किंवा बोगद्याची कोणतीही हानी झाली नाही. मात्र तरीही विरोधकांकडून प्रकल्पाबाबत सोशल मीडियावर आरोपांचे रान उठविण्यात आले. या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले.(Devendra Fadnavis Connecting Link Response)
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील दरड कोसळण्याच्या घटनेबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "हा पूर्णपणे अभूतपूर्व प्रकार आहे. हा अप्रत्याशित किंवा विचार न केलेला इव्हेंट आहे. जिथे हे लँडस्लाईड झाले त्या भागामध्ये सरासरीपेक्षा तीनपट जास्त आणि अतिशय हाय इंटेन्सिटीने पाऊस झाला. साधारणपणे तिथे अशा दरडी कोसळण्याचे प्रकार कधी घडले नाहीत. विशेषतः मलबा येत असल्यामुळे फोर व्हीलर छोटी वाहनं त्यात अडकली आहेत. 100 टन मलबा येणं हा आजपर्यंत न घडलेला इव्हेंट आहे."(Devendra Fadnavis Connecting Link Response)
विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या कनेक्टिंग लिंकबाबत विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. "बघा अशा व्यक्तींना उत्तर दिलं पाहिजे की ज्यांना समजतं. ज्यांना केवळ टीका करायची आहे, ज्यांनी जीवनात काही केलं नाही, एक पूल बांधला नाही, ज्यांच्या पक्षाने महाराष्ट्राचा सत्यानाश केला ते आम्हाला प्रश्न विचारत आहे."
ते पुढे म्हणाले, "आजही आपण जाऊन बघा, इंजिनियरिंग मार्व्हल असलेल्या या कनेक्टिंग लिंकमध्ये बोगदा असेल, व्हायाडक्ट असेल, इतक्या प्रचंड परिस्थितीमध्येही त्या ठिकाणी कुठलंही डिझास्टर झालेलं नाही. जे झालं आहे ते समोरच्या भागात दरड कोसळल्यामुळे झालेलं आहे. ज्यांना भ्रष्टाचार करण्याची सवय होती त्यांना मनामनातून असं वाटतंय की यांच्या काळात का होत नाही आणि म्हणून ते बिनबुडाचे आरोप करतात."(Devendra Fadnavis Connecting Link Response)
हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, "मला पुन्हा सांगायचं आहे, हर्षवर्धन सपकाळांच्या पक्षाने 2013 मध्ये 13 कारणं लिहून कनेक्टिंग लिंक होऊ शकत नाही असं सांगत त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी फाईल बंद केली होती. पण महायुतीच्या सरकारने ती हिं्मत दाखवली आणि ती कनेक्टिंग लिंक तयार केली." (Devendra Fadnavis Connecting Link Response)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.