मुंबई : (Devendra Fadnavis Heavy Rain Advisory) आज दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात वारे वाहणार आहेत. त्यामुळे झाडांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. जिथे होर्डिंग्स आहेत तिथे परिणाम होऊ शकतो. या दृष्टीने लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे. शक्यतो प्रवास टाळावा. कुणीही अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केले आहे. विधानसभेत राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.
सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात वारे वाहणार आहेत. लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे. जिथे जिथे संभाव्य दुर्घटना घडू शकते असं वाटतंय, तिथल्या लोकांना सुरक्षितस्थळी नेले आहे. लोकांनीही सावधानता ठेवावी. शक्यतो प्रवास टाळावा. कुणीही अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये. विशेषत: आजचे वारे आणि पावसाची परिस्थिती बघता युवकांनी पावसाळी पर्यटन टाळावे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षातून मी आढावा घेणार आहे. यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही. कुठे कमतरता राहिली असेल तर दूर करण्याचं काम राज्य शासनाच्या वतीने केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(Devendra Fadnavis Heavy Rain Advisory)

मुंबई-पुणे प्रवास टाळा! रस्ते-रेल्वे वाहतूक ठप्प
तसेच निसर्गामुळे अनपेक्षित घटना घडत आहेत. सभागृहात विरोधी पक्षाने जे मांडले त्याचे गांभीर्य आहेच मात्र रविवारी मुंबईत ५० किमी ताशी वारे वाहत होते. जर मुंबईत पाहिले तर दरवर्षी पावसाळ्यात सरासरी ८०० झाडे पडतात. परंतु रविवारी एका दिवसात ३५० झाडे पडली आहेत. आजचा दिवस त्यापेक्षाही गंभीर आहे. त्यामुळे आज आपण वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. आज दुपारनंतर ७० ते ९० किमी ताशी वेगाने वारे वाहणार आहे. ज्या घटना घडल्या त्या दुर्दैवी आहेत. जी इमारत कोसळली ती पूर्णपणे बेकायदेशीर होती. ती इमारत ज्या झोपड्यांवर पडली तिथे लोक दगावले आहेत. मुंबई-पुणे रस्त्यावर दरड कोसळली आहे. या ज्या काही घटना आहे त्या निसर्गाचे जे बदललेले चक्र आहे त्यातून घडल्या आहेत. प्रशासनाने कुठली तयारी केली नव्हती असं नाही परंतु जी तयारी केली त्यापेक्षा विपरीत परिणाम होताहेत. निश्चितपणे संपूर्ण महापालिका, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा रस्त्यावर आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, कनेक्टिंग लिंकजवळ दरड कोसळली तसं तातडीने इथली वाहतूक बंद करण्यात आली. आज खूप लोक अडकलेत अशी परिस्थिती दिसत नाही. जे काही लोक अडकलेत त्यांनाही तिथून बाहेर काढण्याची व्यवस्था केली आहे. दरड कोसळल्याने रस्त्यात पाणी साचले आहे तिथे अडकलेली छोटी वाहने बाहेर काढण्याचं काम केले जात आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. गेल्या २-३ दिवसांत घडलेल्या घटना, अशा घटना होऊ नये म्हणून केलेली कारवाई आणि यापूर्वी केलेली तयारी यावर राजकीय बोलायचे झाले तर मागची आकडेवारी देऊ शकतो. परंतु त्यामुळे गेलेल्या लोकांचे जीव परत आणता येत नाही. त्यामुळे आपल्याला संवेदनशील राहावे लागेल. याबाबत उद्या संपूर्ण निवेदन सभागृहात सादर केले जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.(Devendra Fadnavis Heavy Rain Advisory)
सभागृहात निवेदन सादर करण्याची विरोधकांची मागणी
मुंबईत पावसामुळे आतापर्यंत १३ लोकांचे जीव गेलेत. कुठे मॅनहोलमध्ये पडून तर कुठे झाड कोसळून हे मृत्यू झालेत. महापालिकेचीही जबाबदारी आहे की नाही, निष्काळजीपणाची किंमत लोकांना मोजावी लागते. मिसिंग लिंकवर दरड कोसळली. पहिल्या पावसात खड्डे पडले. रेल्वे ठप्प झाली आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांचा संपर्क विस्कळीत झाला आहे. या सगळ्या दुरावस्थेबाबत सरकारने निवेदन सादर करावे आणि वस्तूस्थिती लोकांसमोर मांडावी अशी मागणी काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली होती.(Devendra Fadnavis Heavy Rain Advisory)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.