पुणे: (Pune Rain Alert) मुंबईसह पुणे जिल्ह्यातही मान्सूनने जोरदार पुनरागमन केले असून गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण समूहात पाण्याची आवक वाढत असून, लोणावळ्यात अवघ्या २४ तासांत २६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (Pune Rain Alert)
खडकवासला धरण समूहात पाणीसाठ्यात वाढ...
सततच्या पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची हळूहळू वाढ होत आहे. (Pune Rain Alert)
सध्याचा पाणीसाठा: (Pune Rain Alert)
खडकवासला: १४.९७%
पानशेत: २२.९९%
वरसगाव: १७.६६%
टेमघर: २.३१%
एकूण धरणसाठा: १७.४६%
तुलनेत, गेल्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये ६०.६२ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा अजूनही समाधानकारक पाऊस होण्याची गरज कायम आहे. (Pune Rain Alert)
लोणावळ्यात विक्रमी पाऊस
पर्यटननगरी लोणावळ्यात पावसाने दमदार हजेरी लावत गेल्या २४ तासांत २६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यंदाच्या हंगामातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस मानला जात आहे. आतापर्यंत लोणावळा परिसरात १,०९० मिलिमीटर पाऊस झाला असून, यामुळे धबधबे आणि पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पावसामुळे व्यापारी वर्ग आणि शेतकरी दोघांनाही दिलासा मिळाला आहे. (Pune Rain Alert)
उजनी धरणात पाण्याची आवक सुरू
पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट परिसरात झालेल्या पावसाचा परिणाम आता भीमा खोऱ्यात दिसू लागला आहे. दौंड बंधाऱ्यातून सुमारे ६,८८३ ते ७,००० क्युसेक पाणी उजनी धरणाकडे येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या उजनी धरणाची पातळी उणे २७.९६ टक्के इतकी असली तरी नव्याने सुरू झालेली आवक भविष्यातील जलसाठ्यासाठी दिलासादायक मानली जात आहे. (Pune Rain Alert)
पवना धरणात २४ तासांत ५ टक्के वाढ
पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरातही जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत ९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणाच्या पाणीसाठ्यात थेट ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या धरणात २३.९० टक्के पाणी असून, गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ७१.४८ टक्के होता. (Pune Rain Alert)
राज्यात अनेक भागांत जनजीवन विस्कळीत
शनिवारी ४ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक आणि विदर्भातील अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईत सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून, विमान वाहतुकीलाही फटका बसला. कमी दृश्यमानतेमुळे काही उड्डाणे वळवावी लागली, तर अनेक विमानांना 'गो-अराउंड' करावे लागले. (Pune Rain Alert)
हवामान विभागाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने ६ जुलैपर्यंत पुणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांच्या घाटमाथा भागासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Pune Rain Alert)
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या मध्य भागात मान्सून अधिक सक्रिय झाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Pune Rain Alert)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.