मुंबई : (Mumbai Metro 2A) दहिसर–अंधेरी पश्चिम ‘मेट्रो २ अ’ मार्गिकेवर शनिवारी, दि. ४ जुलै रोजी तांत्रिक बिघाड झाल्याने काही काळ मेट्रो सेवा विस्कळीत झाली होती. महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल)च्या तांत्रिक पथकाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर बिघाड दूर करण्यात आला आणि दोन्ही मार्गांवरील सेवा पूर्ववत करण्यात आली.
सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ‘मेट्रो २ अ’ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड झाल्याने एक मेट्रो गाडी मांडपेश्वर स्थानकात अचानक थांबली होती. त्यामुळे काही काळ प्रवाशांची गैरसोय झाली. सेवा पूर्णपणे बंद पडू नये म्हणून एमएमएमओसीएलने तातडीने पर्यायी परिचालन व्यवस्था लागू केली होती. बिघाडग्रस्त मार्गावर दुरुस्ती सुरू असतानाच दुसऱ्या मार्गावरून मेट्रो सेवा सुरू ठेवण्यात आली होती. (Mumbai Metro 2A)
तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच मेट्रोचे तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मुसळधार पावसातही सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करण्यात आले आणि अल्पावधीतच तांत्रिक अडचण दूर करण्यात आली. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर दोन्ही मार्गांवरील मेट्रो सेवा नियमितपणे सुरू करण्यात आली. (Mumbai Metro 2A)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.