मुंबईसह ६ जिल्ह्यांना रेड अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन



 
Maharashtra Heavy Rain Alert
 
मुंबई: (Maharashtra Heavy Rain Alert) महाराष्ट्रात मान्सूनचा जोर सलग पाचव्या दिवशीही कायम असून मुंबईसह कोकण आणि घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) ५ जुलै रोजी मुंबईसह रायगड, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि नाशिक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून, ६ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. (Maharashtra Heavy Rain Alert)
 
सततच्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. वाहतूक, रेल्वे सेवा आणि दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होत असल्याने प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. (Maharashtra Heavy Rain Alert)
 
मुख्यमंत्र्यांनी जारी केले हेल्पलाइन क्रमांक
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स'वरील पोस्टद्वारे रेड अलर्ट असलेल्या भागांची माहिती देत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी हेल्पलाइन क्रमांकही जाहीर केले. (Maharashtra Heavy Rain Alert)
 

महत्त्वाचे हेल्पलाइन क्रमांक:
 
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC): 1916
 
पालघर: 02525-297474 / +91 82379 78873
 
ठाणे महानगरपालिका: 022-25364779 / 022-25301740 / +91 93723 38827
 
ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष: 1800-222-108 / 8657887101
 
पनवेल महानगरपालिका: 022-27458040 / 41 / 42
 
नद्या धोक्याच्या पातळीवर

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी आणि अंबा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि नदी, पूल तसेच पाण्याजवळ जाणे टाळण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. (Maharashtra Heavy Rain Alert)
 
मुंबई आणि घाटमाथ्यावर विक्रमी पाऊस (Maharashtra Heavy Rain Alert)
 
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मागील २४ तासांत:
 
कुलाबा: 265.6 मिमी
सांताक्रूझ: 227.7 मिमी
 
तर घाटमाथा परिसरातही अतिवृष्टी झाली आहे. (Maharashtra Heavy Rain Alert)

महत्त्वाची पर्जन्यमान नोंद:
 
माथेरान – 408 मिमी
 
डोंगरवाडी – 398 मिमी
 
भिरा – 386 मिमी
 
ताम्हिणी – 310 मिमी
 
खोपोली – 285 मिमी
 
शिरगाव – 275 मिमी
 
दावडी – 268 मिमी
 
लोणावळा – 263 मिमी
 
अंबोना – 249 मिमी
 
वालव्हण – 229 मिमी
 
कोयना (नवजा) – 210 मिमी
 
या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. (Maharashtra Heavy Rain Alert)
 
खोपोलीत १०० हून अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका
 
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील झेनिथ धबधबा परिसरात पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने १०० हून अधिक पर्यटक अडकले. घटनेची माहिती मिळताच विहारी ठाकूरवाडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी दोऱ्यांच्या साहाय्याने सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका केली. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. (Maharashtra Heavy Rain Alert)

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर
 
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला बळ मिळाले असून पुढील चार ते पाच दिवस कोकण, गुजरात आणि मध्य प्रदेशातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे. (Maharashtra Heavy Rain Alert)
 
आजचे हवामान अलर्ट
 
रेड अलर्ट:
 
मुंबई
 
पालघर
 
ठाणे
 
रायगड
 
पुणे घाटमाथा
 
सातारा घाटमाथा
 
ऑरेंज अलर्ट:
 
नाशिक घाटमाथा
 
रत्नागिरी
 
कोल्हापूर घाटमाथा
 
अमरावती
 
वाशिम
 
यवतमाळ
 
नागपूर
 
भंडारा
 
गोंदिया
 
यलो अलर्ट:
 
सिंधुदुर्ग
 
नाशिक पठारी भाग
 
धुळे
 
हिंगोली
 
छत्रपती संभाजीनगर
 
जालना
 
परभणी
 
नांदेड
 
बुलढाणा
 
अकोला
 
वर्धा
 
चंद्रपूर
 
गडचिरोली
 
सततच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे, पर्यटनस्थळे, धबधबे आणि नदीकाठच्या भागात जाणे टाळण्याचे तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. (Maharashtra Heavy Rain Alert)
 

 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर