गडहिंग्लज येथील हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पूलजवळील रस्ता गेला वाहून

    05-Jul-2026
Bhadgaon Bridge Road
 
मुंबई : (Bhadgaon Bridge Road) गडहिंग्लज येथील हिरण्यकेशी नदीवरील प्रसिध्द भडगाव पूलजवळील लहान पूल रस्ताच वाहून गेला असल्याने नागरिकांची व प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.दोन तीन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे हिरण्यकेशी नदीस पूर स्थिती आली व पुल रस्ता वाहून गेल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झालेली पहायला मिळत आहे.
 
गडहिंग्लज येथून नेसरी,चंदगडला जाण्यासाठी हा पर्यायी रस्ता होता.पण आता हा रस्ता वाहून गेल्याने प्रवाश्यांना लांबचा प्रवास करून जावे लागणार आहे. यामुळे गडहिंग्लज नेसरी व गडहिंग्लज चंदगड रस्ता बंद करण्यात आला आहे.नवीन पूल रस्त्याचे काम अंतिम टप्यात आले असताना ही घटना घडली आहे. त्यामुळे आता नवीन पुलरस्ता बांधताना देखील काळजी घ्यावी लागणार आहे.तसेच नागरिक नवीन पूल रस्त्यावर पावसात देखील सेल्फी आणि फोटो साठी बांधकाम ठिकाणी सुद्धा जात आहेत.(Bhadgaon Bridge Road)
 
 
 




संबंधित मजकूर