‘एशियाटिक टुमॉरो‌’ पॅनेलचा दणदणीत विजय

    05-Jul-2026
 
Asiatic Tomorrow
 
मुंबई: (Asiatic Tomorrow) मुंबईतील ज्ञानाचे केंद्र अशी ओळख असलेल्या ‌‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई‌’ची रखडलेली निवडणूक अखेर दि. ४ जुलै रोजी संपन्न झाली. या निवडणुकीमध्ये डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वातील ‌‘एशियाटिक टुमॉरो‌’ या गटाने बाजी मारली असून, विजयश्री खेचून आणला आहे. (Asiatic Tomorrow)
 
या निवडणुकीत अध्यक्षपदाचे उमेदवार असलेल्या डॉ. विनय सहस्रबुद्धे यांना ३४९ मते मिळाली असून, कुमार केतकरांना केवळ १४७ मतांवर समाधान मानावे लागले आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षपद, छाननी समिती, व्यवस्थापन समिती आदी पदांवरसुद्धा ‌‘एशियाटिक टुमॉरो‌’च्या उमेदवारांनी विजयाची मोहोर उमटवली आहे. सकाळपासून मुसळधार पाऊस असला, तरी ‌‘एशियाटिक‌’च्या भविष्यासाठी सुजाण मतदारांनी मतदान केले. एकूण ५१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. (Asiatic Tomorrow)
 
एशियाटिक सोसायटीच्या सदस्यत्व नोंदणी, मतदार यादी आणि मतदानाच्या पात्रतेवरून वाद निर्माण झाला होता. काही सदस्यांनी मतदार यादीतील अनियमिततेवर प्रश्न उपस्थित केले होते, तर काही गटांनी निवडणुकीच्या वेळापत्रकावर आणि प्रक्रियेवर आक्षेप नोंदवले होते. त्यामुळे ही निवडणूक सातत्याने चर्चेचा विषय ठरली होती. (Asiatic Tomorrow)
 
सगळ्यांच्या इच्छाशक्तीचा विजय
 
संस्थेच्या हितासाठी काम व्हावे, संस्थेच्या भल्यासाठी काहीतरी करावे, ही ज्यांची अंतरिक इच्छा आहे, त्या सगळ्यांच्या इच्छाशक्तीचा हा विजय आहे. कोणत्याही प्रकारच्या राजकीय पक्षपातापासून दूर राहून, वैचारिक अस्पृश्यतेला फाटा देत, या संस्थेला गतवैभव प्राप्त व्हावे, नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग या संस्थेमध्ये व्हावा, आर्थिक व्यवस्था सुधारावी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रश्नांचा सामोपचाराने निचरा व्हावा, या भावनेने आम्ही काम करू. (Asiatic Tomorrow)
- डॉ. विनय सहस्रबुद्धे
 
‌‘सेव्ह एशियाटिक‌’च्या पंडालमध्ये दुपारनंतर शुकशुकाट!
 
एका बाजूला ‌‘एशियाटिक टुमॉरो‌’च्या पंडालमध्ये सातत्याने दिवसभरात लोकांची रेलचेल बघायला मिळाली, तर दुसऱ्या बाजूला ‌‘सेव्ह एशियाटिक‌’च्या पंडालमध्ये दुपारनंतर शुकशुकाट बघायला मिळाला. ‌‘एशियाटिक टुमॉरो‌’चे अनेक उमेदवार मतमोजणीच्या अखेरच्या क्षणापर्यंत सभागृहात उपस्थित होते, तर दुसऱ्या बाजूला पराभव डोळ्यासमोर दिसताच केतकर पॅनेलचे उमेदवार सभागृहात दिसले नाहीत. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ‌‘भारतमाता की जय‌’ या घोषणा देत, ‌‘सहस्रबुद्धे पॅनेल‌’कडून जल्लोष करण्यात आला. (Asiatic Tomorrow)
 
मतदानात मागील वेळेपेक्षा तिप्पट वाढ; बहुसंख्येने नवमतदार
 
मतदानांमध्ये २५३० पैकी ५१७ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानात तिप्पट वाढ झाली असून यावेळच्या मतदानात नवमतदार बहुसंख्येने उतरल्याचे दिसले. धर्मादाय आयुक्तांच्या देखरेखेखाली ही निवडणूक पार पडली. आयुक्त यांचे प्रतिनिधी के. डी. तळोकर हे निवडणूक निर्णय अधिकारी होते. (Asiatic Tomorrow)
 
कोणाला किती मते? (Asiatic Tomorrow)
 
अध्यक्ष
 
डॉ. विनय सहस्रबुद्धे : ३४९
 
मानद सचिव
 
विवेक वसंत गणपुले : ३५२
 
उपाध्यक्ष
 
रमेश पतंगे : ३२९
 
नितीश भारद्वाज : ३२८
 
चंद्रप्रकाश द्विवेदी: ३२७
 
संजय देशमुख : ३२३
 
व्यवस्थापन समिती
 
प्राची मोघे : ३४२
 
माधव भांडारी : ३३९
 
मल्हार कुलकर्णी : ३३३
 
प्रमोद बापट : ३२९
 
व्ही. एम. चक्रवर्ती : ३२४
 
राजेश बेहरे : ३२१
 
छाननी समिती
 
स्नेहा नगरकर : ३७०
 
अभिजित मुळ्ये : ३६२
 
माधवी नरसाळे : ३६२
 
उमंग काळे : ३५८
 
अमोल जाधव : ३४९
 
मल्हार गोखले : ३४८
 
दत्तात्रय पंचवाघ : ३४४
 
 




संबंधित मजकूर