एशियाटिक मधल्या परिवर्तनाचे मान्यवरांकडून स्वागत

    05-Jul-2026   

 
Asiatic Society Election
 
मुंबई : (Asiatic Society Election) एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकीमध्ये एशियाटिक टुमॉरो पॅनलचा विजय हा केवळ मतदानातील विजय नसून, ती परिवर्तनाची नांदी आहे. एशियाटिकच्या भविष्यासाठी व्हिजन मांडणाऱ्या एशियाटिक tommrow पॅनल च्या नवीन सदस्यांचे अभिनंदन करताना, मान्यवरांनी नोंदवलेल्या काही प्रतिक्रीया
 
परिवर्तन हे चांगल्या भविष्याचे द्योतक!
 
“ एशियाटिक सोसायटीमध्ये घडणारे परिवर्तन हे चांगल्या भविष्याचे द्योतक आहे. एशियाटिक मध्ये पुस्तकांचा खजिनाच आपल्याला सापडतो. मात्र हा ठेवा लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आपल्याकडची जुनी माणसं म्हणण्याची की भाकरी फिरवली पाहिजे. या निकालाने एशियाटिक मध्ये मतदारांनी भाकरीच फिरवल्याचे दिसते.” (Asiatic Society Election)
- प्रमोद पवार, ज्येष्ठ दिग्दर्शक
 
संस्था योग्य माणसांच्या हातात!
 
“ एशियाटिक मध्ये बऱ्याच काळानंतर ही निवडणूक संपन्न झाली आहे. त्या अनुषंगाने निवडून आलेल्या लोकांचे अभिनंदन. चांगली व्यवस्था टिकवण्यासाठी तिथे काम करणारी चांगली माणसं लागतात. त्यामुळे संस्था योग्य माणसांच्या हातात आहे असं म्हणूया ''
- अरुण नलावडे, ज्येष्ठ अभिनेते
 
वेगळा विचार देणारी माणसं आली याचा आनंद
 
“ साहित्य परिषदेमध्ये जो बदल झाला तोच बदल एशियाटिक संस्थेमध्ये झाला असं मी म्हणेन. त्याचबरोबर वेगळा विचार देणारी माणसं या संस्थेमध्ये आता काम करतील याचा आनंद आहे. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या सारखं सक्षम नेतृत्व एशियाटिकला लाभलं याचा आनंद आहे. येणाऱ्या काळात संस्थेमध्ये वेगळ्या आणि भरीव गोष्टी घडतील याची खात्री आहे.”
- योगेश सोमण, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

मतदानाचा वाढलेला टक्का ही स्वागतार्ह बाब
 
“यावर्षीची एशियाटिक सोसायटीची निवडणूक अत्यंत चुरशीने लढली गेली. या वर्षी मतदानाचा वाढलेला टक्का ही स्वागतार्ह बाब आहे असं मला वाटतं. येणाऱ्या काळात एशियाटिक मध्ये असलेली ग्रंथसंपदा येणाऱ्या काळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा आहे. एशियाटिक हे केवळ ग्रंथालय नसून ते एक heritage आहे. त्यामुळे तिथे विचारांचे व्यासपीठ निर्माण झाले पाहिजे.”
- सारंग दर्शने, ज्येष्ठ पत्रकार
 
“आजचा निकाल व्यक्तींचा विजय नाही; तो एशियाटिकच्या तिसऱ्या शतकाच्या प्रारंभाचा लोकनिर्णय आहे. दोन शतकांची जपलेली ज्ञानपरंपरा आता अधिक लोकाभिमुख, संशोधनाभिमुख आणि भविष्याभिमुख होणार आहे. संग्रहांचे संवर्धन, जागतिक डिजिटायझेशन, तरुण संशोधकांचा सहभाग आणि सार्वजनिक बौद्धिक संवाद- ही नव्या व्यवस्थापनाची चार प्रमुख वचने असतील. एशियाटिक आता केवळ ग्रंथालय म्हणून नव्हे, तर समाजाच्या सार्वजनिक विवेकाचे खुले विद्यापीठ म्हणून उभे राहील. इतिहास जपतानाच भविष्य घडविण्याची ही सामूहिक प्रतिज्ञा आहे”. (Asiatic Society Election)
-प्रा. डॉ. संजय देशमुख, नवनिर्वाचित उपाध्यक्ष, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई
 

 




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
संबंधित मजकूर