राजकीय धर्मांतर' झालेल्यांनी हिंदुत्वावर बोलू नये - 'रामरक्षा आंदोलन म्हणजे नौटंकी;उद्धव ठाकरेंवर मंत्री नितेश राणेंचा जहाल हल्ला

- पाकिस्तानातील अब्बांना खूश करण्यासाठी राम मंदिरावर टीका

    04-Jul-2026
( Nitesh Rane statement)
 
मुंबई : ( Nitesh Rane statement) राम मंदिराच्या देणगी निधीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या आरोपांनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर अत्यंत आक्रमक शब्दांत पलटवार करत, "राजकीय धर्मांतर झालेल्यांनी हिंदू धर्म आणि हिंदुत्वावर बोलण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे," असा हल्लाबोल केला.
 
विधान भवन परिसरात माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले, "राम मंदिराच्या नावावर 'रामरक्षा' आंदोलनाची नौटंकी करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा प्रभू श्रीराम आणि हिंदू धर्माशी आता काहीही संबंध राहिलेला नाही. पाकिस्तानात बसलेल्या आपल्या अब्बांना खूश करण्यासाठीच ते राम मंदिर आणि हिंदू राष्ट्राची बदनामी करत आहेत."( Nitesh Rane statement)
 
राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळावरही निशाणा साधत, "कोरोनाच्या काळात हिंदूंचे सण, मंदिरे आणि महाआरतींवर निर्बंध घालणारे, पण अजान आणि इतर धार्मिक कार्यक्रमांवर मौन बाळगणारे 'उद्धव उल-हक' आता मंदिरांमध्ये जाऊन हिंदुत्वाचा आव आणत आहेत," अशी टीका केली.
 
राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य करणाऱ्या ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले, "राम मंदिर आमच्यासाठी निवडणुकीचा विषय नाही, तर श्रद्धा आणि अस्मितेचा विषय आहे. भाजपच्या जन्मापूर्वीपासून आम्ही हिंदू आहोत. आमच्या मनातून राम काढणे अशक्य आहे."( Nitesh Rane statement)
 
उद्धव ठाकरेंच्या भाषेची तुलना करताना राणे यांनी, "त्यांची भाषा आणि एखाद्या दहशतवाद्याची भाषा यात आता काहीच फरक उरलेला नाही," असा गंभीर आरोप केला. तसेच २०१९ मध्ये भाजपशी युती तोडून सत्ता स्थापन करणाऱ्या ठाकरे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधत, "ऑपरेशन भाजप राबवून पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांनी आता हिंदुत्व आणि मराठी अस्मितेच्या गप्पा मारू नयेत," असे म्हटले.( Nitesh Rane statement)
 
संजय राऊत यांच्या वक्तव्यावरही राणे यांनी उपरोधिक टीका करत, "'सामना'मधील पगार आणि भविष्यातील पेन्शन टिकवण्यासाठीच त्यांची विधाने सुरू असतात. त्यामुळे त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही," असा टोला लगावला.
दरम्यान, अमित शाह यांच्यासोबत अयोध्येला जाण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर देताना राणे म्हणाले, "उद्या उद्धव ठाकरे माझ्यासोबत मंदिरात यायला तयार असतील, तर मी स्वतः त्यांना घेऊन जाईन. कदाचित त्यांचे शुद्धीकरण करून त्यांची 'घरवापसी'ही करून टाकीन," असा राजकीय टोला त्यांनी लगावला.( Nitesh Rane statement)
 
 




संबंधित मजकूर