मुंबईसह कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट...

 
Maharashtra Heavy Rain Alert
 
मुंबई: (Maharashtra Heavy Rain Alert) भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील पावसाबाबत महत्त्वाचा इशारा जारी केला असून, शनिवारी ४ जुलै रोजी मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि घाटमाथ्यांवर पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Maharashtra Heavy Rain Alert)
 
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, सखल भागांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्यास सांगण्यात आले आहे. (Maharashtra Heavy Rain Alert)
 
मुंबई आणि कोकणासाठी रेड अलर्ट
 
हवामान विभागाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांवरही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांमध्ये अतिवृष्टीमुळे सखल भागांत पाणी साचणे, दरडी कोसळणे, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Heavy Rain Alert)
 
ऑरेंज आणि येलो अलर्ट
 
ऑरेंज अलर्ट रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, वाशिम, यवतमाळ, गोंदिया तसेच कोल्हापूरच्या घाट भागासाठी जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Heavy Rain Alert)
 
तर येलो अलर्ट जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि इतर काही जिल्ह्यांसाठी देण्यात आला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Maharashtra Heavy Rain Alert)
 
पुढील काही दिवसांचा अलर्ट
 
रेड अलर्ट
 
शनिवार: पालघर, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट
 
रविवार: पालघर, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे घाट
 
ऑरेंज अलर्ट
 
शनिवार: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, वाशिम, यवतमाळ, गोंदिया, कोल्हापूर घाट
 
रविवार: रायगड, रत्नागिरी, नाशिक घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट
 
सोमवार: पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट
 
मंगळवार: रायगड, पुणे घाट
 
येलो अलर्ट
 
शनिवार: जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड
 
रविवार: नंदुरबार, धुळे, नाशिक, सिंधुदुर्ग, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
 
सोमवार: सिंधुदुर्ग, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक घाट, कोल्हापूर घाट
 
मंगळवार: पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
 
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
 
प्रशासनाने नागरिकांना पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहण्याचे, डोंगराळ भागात अनावश्यक प्रवास टाळण्याचे तसेच हवामान विभागाच्या ताज्या सूचनांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनीही विजांच्या कडकडाटाच्या वेळी शेतात जाणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे. (Maharashtra Heavy Rain Alert)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर