जालना: (Jalna ST bus accident) जालना जिल्ह्यातील अंबड-वडीगोद्री मार्गावरील शहापूर परिसरात शनिवारी ४ जुलै रोजी दोन एसटी बसची समोरासमोर भीषण धडक होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात दोन्ही बसचालक गंभीर जखमी झाले असून, शाळकरी विद्यार्थ्यांसह सुमारे ३० ते ४० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने अंबड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Jalna ST bus accident)
विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस अपघातग्रस्त....
प्राथमिक माहितीनुसार, (MH 14 BT 1750) क्रमांकाची मानव विकास मिशन अंतर्गत धावणारी एसटी बस भांबेरी येथून शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन अंबडकडे जात होती. या बसमध्ये सुमारे २५ ते ३० विद्यार्थी प्रवास करत होते. त्याचवेळी (MH 14 BT 3022) क्रमांकाची दुसरी एसटी बस अंबडहून बीडकडे निघाली होती. शहापूरजवळील गल्हाटी नदीच्या पुलावर दोन्ही बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. (Jalna ST bus accident)
धडक इतकी भीषण होती की दोन्ही बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातात दोन्ही बसचालक गंभीर जखमी झाले असून, अनेक विद्यार्थी आणि इतर प्रवाशांनाही दुखापत झाली आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. (Jalna ST bus accident,)
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून रुग्णवाहिकांच्या मदतीने अंबड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांकडून सर्व जखमींवर उपचार सुरू असून गंभीर रुग्णांवर विशेष वैद्यकीय देखरेख ठेवण्यात आली आहे. (Jalna ST bus accident)
वाहतूक काही काळ विस्कळीत
या भीषण अपघातामुळे जालना–वडीगोद्री महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली तसेच अपघातग्रस्त बस बाजूला करण्याचे काम हाती घेतले. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दोन्ही वाहनांचा वेग, रस्त्याची स्थिती आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी करून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. (Jalna ST bus accident)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.