छत्तीसगडमध्ये लवकरच मदरसा बोर्ड बरखास्त होण्याची शक्यता

वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; उत्तराखंडच्या धर्तीवर अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी

    04-Jul-2026   
Chhattisgarh Madrasa Board
 
मुंबई : (Chhattisgarh Madrasa Board) छत्तीसगड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष डॉ. सलीम राज यांनी मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांना पत्र लिहून राज्यातील मदरसा बोर्ड बरखास्त करून त्याऐवजी अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी केली आहे. मदरसा बोर्डाच्या विद्यमान व्यवस्थेमुळे मुस्लिम समाजातील मुलांना आधुनिक शिक्षण मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
 
डॉ. सलीम राज यांनी पत्रात नमूद केले आहे की, मदरशांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी सध्या प्रामुख्याने मौलाना किंवा मौलवी बनत आहेत. त्यामुळे धार्मिक शिक्षणाबरोबरच आधुनिक शिक्षण, संगणक शिक्षण आणि सध्याच्या शिक्षणपद्धतीशी सुसंगत विषयांचाही मदरशांच्या अभ्यासक्रमात समावेश केला जावा. त्यांचा दावा आहे की, सध्याच्या व्यवस्थेत शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी केवळ धार्मिक शिक्षणापुरतेच मर्यादित राहतात. त्यामुळे इतर क्षेत्रांतील संधी त्यांच्यासाठी मर्यादित होतात. तसेच राज्य सरकार दरवर्षी मदरशांना अनुदान देते; मात्र त्याचा अपेक्षित लाभ अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.(Chhattisgarh Madrasa Board)
 
वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी उत्तराखंडचे उदाहरण देत छत्तीसगडमध्येही मदरसा बोर्डाच्या जागी अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन करण्याची सूचना केली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, राज्य सरकार उत्तराखंडच्या मॉडेलचा अभ्यास करत असून, तेथील कायदेशीर व प्रशासकीय तरतुदींची माहितीही घेत आहे.(Chhattisgarh Madrasa Board)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर