मुंबई : (Ayodhya Ram Temple Donation Counting) अयोध्येतील राम मंदिरातील देणगी मोजणीची प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. देणगी चोरीच्या प्रकरणानंतर मोजणी व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून, त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या प्रवेशापासून ते संपूर्ण मोजणी प्रक्रियेपर्यंत नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.(Ayodhya Ram Temple Donation Counting)
नवीन व्यवस्थेनुसार, आता मोजणी कक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला दोन टप्प्यांच्या सुरक्षा तपासणीतून जावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी नवीन गणवेशही लागू करण्यात आला असून, त्यानुसार त्यांना खिसेविरहित, गडद निळ्या रंगाचा गणवेश परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.(Ayodhya Ram Temple Donation Counting)
याशिवाय, मोबाईल फोन, कॅमेरा, बॅग किंवा इतर कोणतेही वैयक्तिक साहित्य मोजणी कक्षात नेण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना कक्षात प्रवेश करण्यापूर्वी बूट-चप्पलही बाहेर काढावे लागतील. मोजणीच्या प्रक्रियेतही बदल करण्यात आला असून, यापुढे खुर्ची-टेबलवर बसून मोजणी करण्याऐवजी जमिनीवर बसून देणगीची मोजणी केली जाणार आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, सुरक्षा रक्षकांसह नागरी पोलिसांचाही बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सतत देखरेख ठेवली जात असून, कॅमेऱ्यांतील चित्रफिती दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच डिजिटल माहितीचे संरक्षण अधिक मजबूत करण्याचाही विचार सुरू आहे.(Ayodhya Ram Temple Donation Counting)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक