मुंबई : (Pawana Dam Nigdi Direct Water Pipeline Project) पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी पवना धरण-निगडी जलशुद्धीकरण केंद्र थेट जलवाहिनी प्रकल्पाला गती मिळाली असून, प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने निर्णायक पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत प्रकल्पातील प्रशासकीय, तांत्रिक, आर्थिक आणि कायदेशीर बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार श्रीरंग बारणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.(Pawana Dam Nigdi Direct Water Pipeline Project)
या बैठकीनंतर विधानसभा उपाध्यक्ष तथा आ. अण्णा बनसोडे यांनी सांगितले की, "प्रकल्पासंदर्भात शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, पुढील आठवड्यात शेतकरी व विविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत सर्व संबंधितांची मते जाणून घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत."(Pawana Dam Nigdi Direct Water Pipeline Project)
पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे प्रकल्पातील सर्व अडथळे दूर करून तो लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर समन्वयाने कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.(Pawana Dam Nigdi Direct Water Pipeline Project)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....