WhatsApp Username Feature: युजरनेमद्वारे संपर्क साधण्याची सुविधा; फिशिंग आणि ऑनलाइन फसवणुकीच्या शक्यतेमुळे केंद्र सरकारची मेटाला नोटीस

 
WhatsApp Username Feature
 
नवी दिल्ली: (WhatsApp Username Feature) जगभरातील 3 अब्जांहून अधिक वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सॲप एक मोठे प्रायव्हसी फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या नवीन फीचरअंतर्गत वापरकर्त्यांना त्यांच्या व्हॉट्सॲप खात्यासाठी युनिक युजरनेम निवडता येणार असून, मोबाईल नंबर शेअर न करताही इतरांशी संपर्क साधता येणार आहे. हे फीचर यावर्षाच्या अखेरीपर्यंत टप्प्याटप्प्याने उपलब्ध करण्याची कंपनीची योजना आहे. (WhatsApp Username Feature)
 
मात्र, या फीचरबाबत भारत सरकारने सावध भूमिका घेतली आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने मेटाला नोटीस बजावत तीन दिवसांत या फीचरची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच चर्चेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत भारतात हे फीचर सुरू करू नये, असेही सांगण्यात आल्याची माहिती माध्यमांवरून मिळत आहे. (WhatsApp Username Feature)
 
मोबाईल नंबरऐवजी युजरनेम...
 
मेटाच्या मालकीच्या व्हॉट्सॲपनुसार, वापरकर्ते स्वतःचा एक वेगळा युजरनेम तयार करू शकतील. नवीन व्यक्ती किंवा ग्रुपशी प्रथमच संपर्क साधताना समोरच्या व्यक्तीला मोबाईल नंबर दिसणार नाही. त्याऐवजी युजरनेमच्या माध्यमातून संपर्क साधता येईल. (WhatsApp Username Feature)
 
व्हॉट्सॲपच्या प्रॉडक्ट प्रमुख एलिस न्यूटन-रेक्स यांनी सांगितले की, या फीचरमुळे वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाईल नंबरवर अधिक नियंत्रण मिळेल आणि गोपनीयता अधिक सुरक्षित राहील.(WhatsApp Username Feature)
 
सरकारची चिंता काय?
 
माध्यमांवरून मिळत असलेल्या माहितीनुसार, सरकारला या फीचरचा फिशिंग, ऑनलाइन फसवणूक, डिजिटल अरेस्ट आणि बनावट ओळख तयार करण्यासाठी गैरवापर होण्याची भीती आहे. त्यामुळे या फीचरची सुरक्षा यंत्रणा आणि पडताळणी प्रक्रिया काय असेल, याबाबत सरकारने मेटाकडे स्पष्टीकरण मागितले आहे. (WhatsApp Username Feature)
 
व्हॉट्सॲपने स्पष्ट केले आहे की, या फीचरमध्ये कोणतीही सार्वजनिक युजरनेम डिरेक्टरी असणार नाही. एखाद्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी तिचा अचूक युजरनेम माहिती असणे आवश्यक असेल. त्यामुळे अनोळखी व्यक्तींना सहजपणे शोधणे शक्य होणार नाही. (WhatsApp Username Feature)
 
चार अंकी सुरक्षा कोडची सुविधाही
 
व्हॉट्सॲप या फीचरसह ऐच्छिक चार अंकी सुरक्षा कोड (Username Key) देखील देणार आहे. हा कोड सुरू केल्यास प्रथमच संपर्क साधणाऱ्या व्यक्तीकडे तुमचा युजरनेम आणि सुरक्षा कोड दोन्ही असणे आवश्यक असेल. त्यामुळे अनोळखी व्यक्तींकडून होणारे अवांछित मेसेज कमी होण्यास मदत होईल. (WhatsApp Username Feature)
 
कोणाला सुरक्षा कोडची गरज भासणार नाही?
 
खालील व्यक्तींना युजरनेम की किंवा सुरक्षा कोडची आवश्यकता भासणार नाही. (WhatsApp Username Feature)
 
ज्यांच्याकडे तुमचा मोबाईल नंबर आधीपासून सेव्ह आहे.
 
ज्यांच्याशी तुम्ही आधीच चॅट केले आहे.
 
जे तुमच्यासोबत समान व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आहेत.
 
ज्यांनी तुमचा QR कोड स्कॅन केला आहे.
 
ज्यांना तुम्ही यापूर्वी मेसेज पाठवला आहे. 
 
इंस्टाग्राम आणि फेसबुक युजरनेमही वापरता येणार.
 
कंटेंट क्रिएटर्स, व्यवसाय आणि संस्थांना एकसमान ऑनलाइन ओळख ठेवता यावी यासाठी इंस्टाग्राम आणि फेसबुकवरील विद्यमान युजरनेम व्हॉट्सॲपवर राखून ठेवण्याची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच प्रसिद्ध व्यक्ती, सरकारी संस्था आणि सार्वजनिक व्यक्तिमत्त्वांचे महत्त्वाचे युजरनेम गैरवापर टाळण्यासाठी सुरक्षित ठेवले जाणार आहेत. (WhatsApp Username Feature)
 
युजरनेम कसा तयार कराल?
 
फीचर उपलब्ध झाल्यानंतर वापरकर्त्यांना व्हॉट्सॲप च्या नवीन आवृत्तीत:
 
सेटिंग्ज → खाते (Account) → युजरनेम
 
या पर्यायावर जाऊन युजरनेम तयार करता येईल. युजरनेम निवडताना अडचण आल्यास व्हॉट्सॲप युझरनेम जनरेटरचा पर्यायही उपलब्ध करून देणार आहे. (WhatsApp Username Feature)
 
व्हॉट्सॲपच्या मते, हे फीचर वापरकर्त्यांची गोपनीयता अधिक मजबूत करण्यासाठी आणि मोबाईल नंबर शेअर करण्याची गरज कमी करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. (WhatsApp Username Feature)
 
 
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर