मुंबई: (Mumbai Manhole Video) मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान साकीनाका परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खैरानी रोड परिसरातील उघड्या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडल्याची माहिती मिळाली असून त्याला शोधण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. या घटनेमुळे पावसाळ्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Mumbai Manhole Video)
प्राथमिक माहितीनुसार, साकीनाका येथील खैरानी रोडवर सुरू असलेल्या कामामुळे मॅनहोलचे झाकण उघडे होते. मुसळधार पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मॅनहोल दिसून न आल्याने संबंधित व्यक्ती त्यात पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा मॅनहोल सुमारे ते 30 फूट खोल असल्याची माहिती समोर आली आहे. (Mumbai Manhole Video)
घटनेची माहिती मिळताच पोलीस, मुंबई अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू असून, ती व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली आहे. (Mumbai Manhole Video)
दरम्यान, मुंबईत बुधवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दादर-प्रभादेवी, माटुंगा, सायन, अंधेरी, मुंब्रा, नालासोपारा आणि कळंबोलीसह अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक आणि दैनंदिन हालचालींमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Mumbai Manhole Video)
दरम्यान, महापौरांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. "इतक्या मुसळधार पावसात मॅनहोल उघडा ठेवण्याची गरज काय होती? संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांना कामाची माहिती होती का? हे काम अधिकृत परवानगीने सुरू होते की खासगी कंत्राटदाराने विनापरवानगी सुरू केले होते? बॅरिकेड्स का लावले नव्हते? या सर्व बाबींची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल," असे महापौरांनी स्पष्ट केले. (Mumbai Manhole Video)
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना पाणी साचलेल्या भागातून जाणे टाळण्याचे आणि मुसळधार पावसाच्या काळात विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. (Mumbai Manhole Video)