मुंबई (Kiran Sarnayak Joins Shiv Sena) : अमरावती येथील शिक्षक मतदारसंघातील आमदार किरण सरनाईक यांनी बुधवार दि.१ जून रोजी मुंबईत एका छोटेखानी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले आहे.किरण सरनाईक हे अमरावती विभागाचे शिक्षक आमदार म्हणून निवडून आले आहेत.काही दिवसापूर्वी ऑपरेशन टायगर अंतर्गत उबाठाचे सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले होते तर उबाठाचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून विधान परिषदेत बिनविरोध उपसभापतीपद मिळवले होते.आता सरनाईक यांच्या निर्णयाने पुन्हा एकदा एकनाथ यांची ताकद वाढली आहे. (Kiran Sarnayak Joins Shiv Sena)
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,"शिवसेना राज्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने काम करत आहे. शिवसेनेचे काम पाहून सरनाईक यांनी आमच्या पक्षाचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले आहे.मी त्यांचे मनापासून स्वागत करतो." (Kiran Sarnayak Joins Shiv Sena)
सहयोगी सदस्यत्व स्वीकारले नंतर बोलताना आमदार सरनाईक म्हणाले की,"मी निवडून आल्यानंतर शिक्षकांचे अनेक प्रश्न समजून घेण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.मी घेऊन गेलेल्या समस्या पोटतिडकीने सोडविण्याचे काम शिंदे यांनी केले आहे." (Kiran Sarnayak Joins Shiv Sena)
तर शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बोलताना उपसभापती सचिन अहिर म्हणाले की ," एकटा सचिनच पुरेसा आहे बाकी टीमची गरज नाही पहिला मला तर स्कोअर करू द्या मग बाकी टीमला आणेन." (Kiran Sarnayak Joins Shiv Sena)