सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; मुंबईत २४ कॅरेट सोनं १,४०,७७० रुपये प्रति १० ग्रॅम, कुठे किती दर?

 
Gold Price Today
 
मुंबई: (Gold Price Today) देशभरातील सराफा बाजारात २ जुलै रोजी सोन्याच्या दरात पुन्हा वाढ नोंदवली गेली आहे. बहुतांश प्रमुख शहरांमध्ये २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे भाव वाढले असून, चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरची मजबुती आणि जागतिक मागणीचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येत आहे. (Gold Price Today)
 
देशाची राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ₹१,४०,९२० इतका झाला असून, २२ कॅरेट सोन्याचा दर ₹१,२९,१९० आहे. आर्थिक राजधानी मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,४०,७७०, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ₹१,२९,४०४ प्रति १० ग्रॅम इतका नोंदवण्यात आला आहे. (Gold Price Today)
 
दरम्यान, मागील व्यवहारात दिल्लीच्या सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा भाव १,३०० रुपयांनी घसरला होता. मात्र, नव्या व्यवहारात पुन्हा तेजी दिसून आली आहे. जागतिक बाजारात स्पॉट गोल्डचा दर प्रति औंस ३,९८६.०७ डॉलर इतका नोंदवला गेला आहे. (Gold Price Today)
 
प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
 
दिल्ली
 
२२ कॅरेट (₹) १,२९,१९०
२४ कॅरेट (₹) १,४०,९२०
 
मुंबई
 
२२ कॅरेट (₹) १,२९,०४०
२४ कॅरेट (₹) १,४०,७७०
 
अहमदाबाद
 
२२ कॅरेट (₹) १,२९,०९०
२४ कॅरेट (₹) १,४०,८२०
 
चेन्नई
 
२२ कॅरेट (₹) १,३२,५१०
२४ कॅरेट (₹) १,४४,५६०
 
कोलकाता
 
२२ कॅरेट (₹) १,२९,०४०
२४ कॅरेट (₹) १,४०,७७०
 
हैदराबाद
 
२२ कॅरेट (₹) १,२९,०४० 
२४ कॅरेट (₹) १,४०,७७०
 
जयपूर
 
२२ कॅरेट (₹) १,२९,१९०
२४ कॅरेट (₹) १,४०,९२०
 
भोपाळ
 
२२ कॅरेट (₹) १,२९,०९०
२४ कॅरेट (₹) १,४०,८२०
 
लखनऊ
 
२२ कॅरेट (₹) १,२९,१९०
२४ कॅरेट (₹) १,४०,९२०
 
चंदीगड
 
२२ कॅरेट (₹) १,२९,१९०
२४ कॅरेट (₹) १,४०,९२०
 
चेन्नईत सर्वाधिक दर
 
देशातील प्रमुख शहरांमध्ये चेन्नईमध्ये सोन्याचे दर सर्वाधिक आहेत. येथे २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,४४,५६०, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ₹१,३२,५१० प्रति 10 ग्रॅम इतका आहे. पुणे आणि बंगळुरूमध्येही मुंबईप्रमाणेच २४ कॅरेट सोनं ₹१,४०,७७० आणि २२ कॅरेट सोनं ₹१,२९,०४० प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे. (Gold Price Today)
 
चांदीही महागली
 
सोन्याबरोबरच चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे. २ जुलै रोजी सकाळच्या व्यवहारात चांदीचा दर प्रति किलो ₹२,४१,००० इतका झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा भाव ५८ डॉलर प्रति औंस इतका नोंदवला गेला आहे. (Gold Price Today)
तज्ज्ञांच्या मते, जागतिक आर्थिक घडामोडी, डॉलरची स्थिती, आंतरराष्ट्रीय मागणी आणि गुंतवणूकदारांचा कल यांचा थेट परिणाम देशांतर्गत सोने-चांदीच्या किमतींवर होत आहे. (Gold Price Today)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर