पीएफ योगदानाच्या नियमांत मोठा बदल; ₹१५,००० वेतनमर्यादेपर्यंतच अनिवार्य कपात



 
नवी दिल्ली: (EPF New Rules 2026) केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने EPF (Employees' Provident Fund) योजना 2026 संदर्भातील नवीन अधिसूचना जारी केली आहे. या बदलानुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) वैधानिक वेतनमर्यादा (सध्या ₹15,000 प्रतिमहिना) पर्यंतच 12 टक्के पीएफ योगदान अनिवार्य केले आहे. या मर्यादेपेक्षा जास्त पगारावर होणारे पीएफ योगदान आता कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक असेल. (EPF New Rules 2026)
 
यामुळे खासगी क्षेत्रातील जास्त पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्ती बचतीसाठी अधिक रक्कम पीएफमध्ये जमा करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मात्र, अतिरिक्त योगदान देणे पूर्णपणे कर्मचाऱ्याच्या इच्छेवर अवलंबून असेल. (EPF New Rules 2026)
 
काय बदलले?

नवीन नियमांनुसार, कर्मचाऱ्याचा पगार ₹1 लाख प्रतिमहिना असला तरी अनिवार्य पीएफ योगदान ₹15,000 वेतनमर्यादेच्या 12 टक्क्यांप्रमाणे ₹1,800 इतकेच राहील. नियोक्त्यालाही तेवढेच अनिवार्य योगदान द्यावे लागेल. (EPF New Rules 2026)
 
तथापि, कर्मचारी इच्छेनुसार उर्वरित पगारातून अधिक रक्कम पीएफमध्ये जमा करू शकतो. नियोक्त्यालाही त्या अतिरिक्त रकमेइतके योगदान देण्याचा पर्याय असेल, मात्र ते बंधनकारक नसणार आहे. कर्मचारी किंवा नियोक्ता हे अतिरिक्त योगदान भविष्यात वाढवू, कमी करू किंवा थांबवू शकतात. (EPF New Rules 2026)
 
समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार ₹1,00,000 प्रतिमहिना आहे. (EPF New Rules 2026)

अनिवार्य पीएफ योगदान: ₹1,800 (₹15,000 च्या 12%) 
नियोक्त्याचे अनिवार्य योगदान: ₹1,800
अतिरिक्त योगदान: कर्मचारी इच्छेनुसार देऊ शकतो.
नियोक्त्याचे अतिरिक्त योगदान: पूर्णपणे ऐच्छिक.

पेन्शन नियमांत बदल नाही (EPF New Rules 2026)
 
EPFO ने स्पष्ट केले आहे की, कर्मचारी पेन्शन योजना (EPS) अंतर्गत पेन्शनची गणना, कंपनीचे योगदान, कर्मचारी योगदान आणि किमान पेन्शनच्या विद्यमान नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. (EPF New Rules 2026)
 
मात्र, पेन्शन प्रक्रिया, पेन्शन निधीच्या गुंतवणुकीची पद्धत आणि विलंब झाल्यास लागू होणाऱ्या दंडासंदर्भात काही नवीन तरतुदी करण्यात आल्या आहेत. (EPF New Rules 2026)

नवीन नियमांनुसार EPF मधून आगाऊ रक्कम काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. पूर्वी असलेल्या 13 श्रेणी कमी करून आता फक्त तीन प्रमुख श्रेणी ठेवण्यात आल्या आहेत. (EPF New Rules 2026)
 
अत्यावश्यक गरजा (आजारपण, शिक्षण, विवाह) 
घरगुती गरजा
विशेष परिस्थिती
 
याशिवाय, वर्षभरात निधी काढण्याच्या परवानगीच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. (EPF New Rules 2026)
 
तज्ज्ञांच्या मते, खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्या CTC (Cost to Company) पद्धतीने वेतन देत असल्यामुळे या बदलांनंतर काही कंपन्या कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेत बदल करू शकतात. त्यामुळे कर्मचारी आणि नियोक्ता परस्पर संमतीने अधिक लाभदायी PF योगदानाची रचना ठरवू शकतील. (EPF New Rules 2026)
 
सध्याचे EPF सदस्य या योजनेअंतर्गत सदस्य राहतील. नवीन नियमांमुळे विद्यमान सदस्यत्वावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही EPFO ने स्पष्ट केले आहे. (EPF New Rules 2026)
 

 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर