पुणे: (Pune Accident) पुण्यात वाहतूक पोलिसाच्या अंगावर टेम्पो घालण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहतूक पोलिसांच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी एका टेम्पो चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत तब्बल २० ते २५ वाहनांना धडक दिली. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून शहरात संताप व्यक्त केला जात आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Pune Accident)
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वानवडी ते रवी दर्शन चौकादरम्यान वाहतूक पोलिसांकडून फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचा असलेल्या वाहनांवर विशेष कारवाई सुरू होती. याचवेळी शहरातून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला पोलिसांनी तपासणीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र कारवाईच्या भीतीने चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पळ काढला. (Pune Accident)
यावेळी टेम्पो चालकाने वाहतूक पोलिसाच्या अंगावर वाहन घालण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याने पुणे-सोलापूर महामार्गावर सुसाट वेगाने वाहन चालवत मार्गातील अनेक दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांना धडक दिली. या अपघातात सुमारे २० ते २५ वाहनांचे नुकसान झाले असून काही नागरिक जखमी झाले आहेत. (Pune Accident)
Pune - A horrific accident occurred in Pune’s Hadapsar area after an underage boy allegedly drove a tempo under the influence of alcohol and crashed into multiple vehicles. The incident took place in the Hadapsar Chowk area. According to preliminary information, the minor rammed… pic.twitter.com/NCbonsb5q2
घटनेमुळे महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. दरम्यान, पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी पाठलाग करत पंधरा नंबर परिसरात टेम्पो अडवला. संतप्त नागरिकांनी टेम्पोवर चढून चालकाला पकडले आणि त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Pune Accident)
या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात टेम्पो चालकाविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. (Pune Accident)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.