भौतिक बुद्धिमत्ता क्षेत्राच्या प्रयोगामुळे दुर्घटनांची तीव्रता कमी होण्यास मदत शक्य; मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा लिमिटेड' आणि 'ॲनलॉग' यांच्या जॉइंट व्हेंचरची घोषणा!
हैदराबाद : (Physical Intelligence India) पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'फिझिकल इंटेलिजन्स' (भौतिक बुद्धिमत्ता) क्षेत्रातील प्रयोग 'मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा लिमिटेड' आणि 'ॲनलॉग' यांच्या जॉइंट व्हेंचरच्या निमित्ताने भारतात केला जात असल्याची घोषणा हैदराबाद येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात करण्यात आली. यावेळी मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रा लिमिटेडचे (एमईआयएल) कार्यकारी संचालक पी व्ही क्रिष्णा रेड्डी आणि 'ॲनलॉग'चे संस्थापक एलेक्स किपमॅन उपस्थित होते. या भागीदारी अंतर्गत भविष्यात भौतिक बुद्धिमत्तेच्या जोरावर उपलब्ध यंत्रणेची मर्यादा आणि ताकद समजून घेणे, संभाव्य धोके असल्यास त्याची पूर्वसूचना, सातत्याने माहिती अंतर्भूत करून सुसज्ज असे मॉडेल उभे करण्याचे ध्येय दोन्ही कंपन्यांनी ठेवले आहे.
पी. व्ही. क्रीष्णा रेड्डी म्हणाले की, "या क्षेत्रात एकूण २८०० कोटींची गुंतवणूक शक्य असून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती शक्य होणार आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रात ॲनलॉगच्या मदतीने भौतिक बुद्धीमत्ता या विषयात भारत आघाडी घेईल यात शंका नाही."
एलेक्स किपमॅन म्हणाले की, "भारताकडे तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडी घेण्याची क्षमता आहेच. एआयच्या वाढत्या वापरानंतर भविष्यात भौतिक बुद्धिमत्ता क्षेत्रात काम करण्याची गरज आहेच. 'एमईएल'च्या माध्यमातून आम्ही भारतात पाऊल ठेवत आहोत." (Physical Intelligence India)
या संयुक्त भागीदारीमुळे पायाभूत सुविधा, दळणवळण, शहरीकरण, उद्योग क्षेत्रातील बदल, सार्वजनिक सुरक्षा अशा अनेक मुद्द्यावर तोडगा काढता येणे शक्य होणार आहे. अत्याधुनिक सेन्सिंग यंत्रणेद्वारे संपूर्ण प्रकल्पाची अद्यावत माहिती यात दिली जाऊ शकते. भौतिक बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रकल्पातील बदल, संभाव्य धोके आणि होणारा परिणाम हा एकत्रित देखरेखीखाली आणता येऊ शकतो. (Physical Intelligence India)
महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे काय?
राज्यात सध्या कोस्टल रोड, अटल सेतू, नवी मुंबई विमानतळ पूर्ण झाले. तिसरी आणि चौथी मुंबई, आर्थिक विकास केंद्र असे अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. (Physical Intelligence India)
अशा विकसित होत असलेल्या शहरी परिसंस्थांना आकार देण्यात फिजिकल इंटेलिजन्स महत्त्वाची भूमिका बजावू शकते. एकात्मिक टाउनशिप, औद्योगिक उद्याने, लॉजिस्टिक्स हब आणि विमानतळ-केंद्रित विकास मार्गिका यांसारख्या नव्या प्रकल्पांमध्ये नियोजनाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच बुद्धिमान पायाभूत सुविधांचा समावेश करता येईल. डिजिटल ट्विन तंत्रज्ञानामुळे शहरी नियोजन अधिक अचूक होऊ शकते, एआयवर आधारित प्रणाली वाहतूक आणि सार्वजनिक सेवा अधिक कार्यक्षमपणे व्यवस्थापित करू शकतात, तर संभाव्य देखभाल खर्चामुळे पायाभूत सुविधांच्या संपूर्ण कार्यकालात देखभाल खर्चात लक्षणीय बचत होऊ शकते, असा दावा दोन्ही कंपन्यांमार्फत करण्यात आला आहे. (Physical Intelligence India)
मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.