नवी मुंबई: (Navi Mumbai heavy rain) नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसादरम्यान नेरुळ परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. नेरुळमधील एलपी स्टॉप (एलपी उड्डाणपूल) परिसरात पावसाच्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने दोन कॉलेज विद्यार्थिनींना जोरदार शॉक बसला. या दोघीही रस्त्यावरच कोसळल्या. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या दोघींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. (Navi Mumbai heavy rain)
ही घटना नेरुळमधील एलपी उड्डाणपूलाजवळ, बिकानेर दुकानासमोरील रस्त्यावर घडली. मुसळधार पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्याचदरम्यान झालेल्या शॉर्टसर्किटमुळे विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याच पाण्यातून जात असताना दोन्ही विद्यार्थिनींना विजेचा धक्का बसला. (Navi Mumbai heavy rain)
वीजेचा जोरदार शॉक लागल्याने दोघीही जागीच खाली कोसळल्या. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना पाण्यापासून दूर नेले आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. वेळेत मदत मिळाल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे. (Navi Mumbai heavy rain)
Navi Mumbai - Amid continuous heavy rainfall lashing Mumbai and its suburbs, a tragic incident occurred in the Nerul area of Navi Mumbai. A short circuit in electrical wires under the LP Bridge, near Bikaner restaurant, caused electricity to spread through the accumulated… pic.twitter.com/FiK5EnP7b4
घटनेनंतर नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पावसाचे पाणी साचू नये आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश दिले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, "शहरात कुठेही पाणी साचणार नाही किंवा नागरिकांच्या घरात पाणी शिरणार नाही, यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र काही ठिकाणी दुर्लक्ष झाल्याने अशा घटना घडत आहेत. विद्यार्थिनींना शॉक लागण्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून यामागे नेमका कोणाचा निष्काळजीपणा आहे, याची सखोल चौकशी करण्यात येत आहे." (Navi Mumbai heavy rain)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.