मुंबई : (Navanath Ban) भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात आलेले देशद्रोह व घटनाद्रोहाचे आरोप फेटाळून लावताना मंगळवार दि.३० रोजी म्हटले की," देवेंद्र फडणवीस हे संविधानानुसार आणि “राष्ट्र प्रथम” या भूमिकेतून काम करणारे नेते असून त्यांनी कधीही आपल्या विचारांशी तडजोड केली नाही. काँग्रेससोबत युती करून हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड करणारे संजय राऊतच महाराष्ट्रद्रोही आहेत. पाकिस्तान आणि औरंगजेबाबाबत मवाळ भूमिका घेणाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांना देशभक्ती शिकवू नये."
"महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपच्या १०५ आमदारांना विकासकामांसाठी एक रुपयाचाही निधी देण्यात आला नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास ठप्प झाला होता. पक्षपाताचा आरोप करणाऱ्या संजय राऊतांनी आधी स्वतःच्या कारभाराचे आत्मपरीक्षण करावे.' असे बन म्हणाले. (Navanath Ban)
देवेंद्र फडणवीस राष्ट्र प्रथमच्या भूमिकेत; महाराष्ट्रद्रोह संजय राऊतांनी केला !
— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) June 30, 2026
" एका महिलेविरोधात कथित शिवीगाळ आणि धमक्यांच्या प्रकरणामुळे संजय राऊत यांनी महिला सुरक्षा आणि महिला सन्मानावर बोलू नये. महिलांच्या अधिकारांबाबत भूमिका मांडण्यापूर्वी स्वतःचे आचरण तपासावे.'असा सल्लाही बन यांनी राऊत यांना दिला.
"राज्यसभेवर निवडून येताना एकनाथ शिंदे आणि तत्कालीन शिवसेनेच्या आमदारांच्या मतांचा आधार राऊत यांना मिळाला होता.त्यामुळे राऊत यांनी आधी स्वतः राज्यसभेचा राजीनामा द्यावा. जनतेने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला स्वीकारले असून उगाच राजकीय नाट्य करू नये.'असेही बन यांनी सांगितले. (Navanath Ban)
"प्रभू श्रीराम आणि रामसेतूच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेससोबत जाणाऱ्यांना आता राम मंदिराचा पुळका आला आहे. मंदिरासंदर्भातील कथित आरोपांची चौकशी सुरू असून, राम मंदिर आंदोलनाची खिल्ली उडवणाऱ्यांना देशातील रामभक्त कधीही माफ करणार नाहीत."असे बन यांनी म्हटले. (Navanath Ban)