स्वर्गीय वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

    01-Jul-2026
 
Vasantrao Naik Birth Anniversary
 
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात बुधवार दि.१ रोजी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कक्ष अधिकारी निलेश हरड, संदेश उतेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे, अमोल चव्हाण, विनोद सोरटे यांनीही स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 
 




संबंधित मजकूर