मुंबई: (Maharashtra Heavy Rain Alert) राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि कोकण किनारपट्टीसह घाटमाथ्यावरील भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. (Maharashtra Heavy Rain Alert)
मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा....
IMD मुंबई प्रादेशिक केंद्राने जारी केलेल्या अंदाजानुसार १ ते ४ जुलैदरम्यान मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अत्यंत तीव्र पावसाची नोंद होऊ शकते. (Maharashtra Heavy Rain Alert)
पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये १ ते ३ जुलैदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ४ आणि ५ जुलैलाही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Maharashtra Heavy Rain Alert)
कोकणात पावसाचा जोर कायम
रायगड जिल्ह्यात १ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर २ ते ४ जुलैदरम्यान रायगड आणि रत्नागिरीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवस अनेक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Maharashtra Heavy Rain Alert)
पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर १ ते ५ जुलैदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये अतिवृष्टीचीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ३० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. (Maharashtra Heavy Rain Alert)
मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये १ आणि २ जुलै रोजी वादळी वाऱ्यासह (४० ते ५० किमी प्रतितास) मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Heavy Rain Alert)
Thunderstorm accompanied with lightning, gusty winds 40-50 kmph, heavy rainfall very likely to occur at isolated places in the districts of Marathwada. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/ZzeA7ZTB5J
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 1, 2026
हवामान विभागाने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. संभाव्य धोके पुढीलप्रमाणे आहेत:
सखल आणि शहरी भागांत पाणी साचण्याची शक्यता.
नद्या-नाले आणि ओढ्यांना पूर येण्याचा धोका.
डोंगराळ आणि घाट रस्त्यांवर दरडी कोसळण्याची शक्यता.
कमकुवत झाडे, जुनी घरे आणि इमारती कोसळण्याचा धोका.
रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता.
विजांच्या कडकडाटादरम्यान उघड्यावर जाणे टाळावे.
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा, हवामान विभागाच्या ताज्या सूचना लक्षात ठेवण्याचा आणि पूरग्रस्त किंवा पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवस राज्यातील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने सर्वांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Heavy Rain Alert)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.