मुंबई : (Bihar Religious Conversion) बिहारच्या सुपौल जिल्ह्यात नेपाळमधून आलेल्या काही मिशनरींनी अनुसूचित जातीतील लोकांना आमिष दाखवून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करण्याचा कथित प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मिशनरींकडून चांगले अन्न, मोफत शिक्षण आणि आजारांपासून मुक्ती मिळवून देण्याचे आश्वासन देत ग्रामस्थांचे ब्रेनवॉश केले जात असल्याचा आरोप आहे. मात्र, सतर्क ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर संबंधितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, मिशनरीशी संबंधित चार जण नेपाळमधील भंटाबारी येथून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भीमनगर येथे आले. तेथून टेम्पोने ते बनैलीपट्टी येथील अनुसूचित जातीतील वस्तीत पोहोचले. येथे किशुनदेव राम यांच्या घरी एक बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये सुमारे ३० ते ४० जण उपस्थित होते. या बैठकीत ग्रामस्थांना पैशांचे आमिष, आजार बरे करण्याचे आश्वासन आणि चांगले अन्न देण्याचे प्रलोभन दाखवून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी कथितपणे प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप आहे.(Bihar Religious Conversion)
दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच इतर ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी विरोध दर्शवला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संबंधित चारही जणांना चौकशीसाठी वीरपूर पोलीस ठाण्यात नेले. ग्रामीणांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित कलमांन्वये चारही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरू आहे.(Bihar Religious Conversion)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक