बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश; ६ जागी महायुतीचे उमेदवार बिनविरोध

    04-Jun-2026   
Total Views |
 
Maharashtra Legislative Council
 
मुंबई: (Maharashtra Legislative Council) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणूकांमध्ये १७ पैकी ६ जागा बिनविरोध झाल्या असून अनेक ठिकाणी बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश आले आहे. गुरुवारी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळाले. मतांचा आकडा जुळत नसल्याचे कारण देत मविआच्या अनेक अधिकृत उमेदवारांनी ऐनवेळी निवडणूकीतून माघार घेतली. (Maharashtra Legislative Council)
 
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. याठिकाणी उबाठा गटातर्फे बाळ माने यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, मंत्री नितेश राणे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात जात त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. दरम्यान, पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत बाळ माने यांची उबाठा गटातून हकालपट्टी करण्यात आली. (Maharashtra Legislative Council)
 
यासोबतच पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे, भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद आणि मविआतील शरद पवार गटाच्या श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. ठाण्यात शिवसेनेचे रवींद्र फाटक उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात असलेले शरद पवार गटाचे अभिजीत पवार यांनी निवडणूकीतून माघार घेतल्याने रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झालेत. (Maharashtra Legislative Council)
 
अहिल्यानगरमध्ये ड्रामा
 
अहिल्यानगरमध्ये काँग्रेसचे बंडखोर करण ससाणे आणि कमलेश गांधी यांनी माघार घेतल्यामुळे भाजप महायुतीचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध निवडून आले आहेत. दरम्यान, सध्या अहिल्यानगरची जागा बिनविरोध झाली असली तरी अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी आक्षेप घेतला आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या अर्जावर सुचकाची खोटी सही केल्याचा आरोप केला आहे. (Maharashtra Legislative Council)
 
विदर्भात 'बिनविरोध'चा धडाका
 
वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर मतदारसंघात भाजप उमेदवार अरुण लखानी बिनविरोध विजयी झाले आहेत. याठिकाणी काँग्रेस उमेदवार शैलेश कुमार अग्रवाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधीर कोठारी या दोन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यवतमाळ मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवडणूकीतून माघार घेतली. यासोबतच भाजपचे बंडखोर उमेदवार बंडखोर नितीन भुतडा आणि राष्ट्रवादीचे साजिद बेग यांनीही अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध विजयी झालेत. (Maharashtra Legislative Council)
 
उर्वरित ११ मतदारसंघातील प्रमुख लढती
 
सोलापूर - राजेंद्र राऊत (भाजप) विरुद्ध वसंतराव देशमुख (शरद पवार गट)
 
जळगाव - नंदकिशोर महाजन (भाजप) विरुद्ध शरद तायडे (उबाठा गट)
 
सांगली-सातारा - धैर्यशील कदम (भाजप) विरुद्ध अभयसिंह जगताप (शरद पवार गट ) विरुद्ध किशोर धुमाळ (अपक्ष)
 
नांदेड - अमर राजूरकर (भाजप) विरुद्ध रामदास पाटील (काँग्रेस)
 
धाराशिव-लातूर-बीड - बसवराज पाटील (भाजप) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस)
 
परभणी-हिंगोली - सईद खान (शिवसेना) विरुद्ध डॉ. विवेक नावंदर (उबाठा)
 
छत्रपती संभाजीनगर-जालना - सुहास शिरसाट (भाजप) विरुद्ध गणेश लोखंडे (उबाठा)
 
नाशिक - नरेंद्र दराडे (शिवसेना) विरुद्ध गोकुळ गीते (अपक्ष)
 
भंडारा-गोंदिया - अविनाश ब्राह्मणकर (भाजप) विरुद्ध नरेश ईश्वरकर (काँग्रेस पाठिंबा)
 
अमरावती - प्रवीण पोटे (भाजप) विरुद्ध हर्षदीप देशमुख (काँग्रेस)
 
नागपूर (पोटनिवडणूक) - डॉ. राजीव पोतदार (भाजप) विरुद्ध अतुल लोंढे (काँग्रेस)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....